Uttarkashi Tunnel Rescue : उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिलक्यारा बोगद्यात (Uttarkashi Tunnel Rescue ) अडकलेल्या 41 मजुरांना तब्बल 17 दिवसानंतर वाचविण्यात यश आले आहे. या रेस्क्यू ऑपरेशनच्या यशानंतर काल पंतप्रधान मोदी यांनी रेस्क्यू टीमला शुभेच्छा दिल्या. आहेत. तर आज त्यांनी या मजुरांशी ऑनलाईन संवाद साधला आहे. यावेळी या मजुरांनी त्यांनी 17 दिवस बोगद्यात कसे काढले या विषयी मोदींना माहिती दिली.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
या मजुरांशी ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी पंतप्रधान म्हणाले की, इतक्या दिवसांच्या संकटानंतर बाहेर आल्यानंतर मी तुम्हाला शुभेच्छा देतो. ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मी ते शब्दांत नाही सांगू शकत. देवाची कृपा आहे की, तुम्ही सर्वजण सुरक्षित आहात. पुढे ते म्हणाले की, 17 दिवसांचा काळ कमी नाही. तुम्ही सर्वांनी हिंमत दाखवली. एकमेकांना प्रोत्साहन दिले. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांचं देखील कौतुक केलं.
पुणे महापालिका करणार मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार; आगामी निवडणुकीसाठी भाजपची ‘आयडिया’
ते म्हणाले की, मी सातत्याने रेस्क्यू ऑपरेशनची माहिती घेत होतो. मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होतो. माझे पीएम कार्यालयाचे अधिकारी तेथे बसून होते. ते ही मला माहिती देत होते. पण केवळ माहिती मिळत होती. म्हणून काळजी कमी होत नाही. यावेळी सबा अहमद नावाच्या मजूराने सर्व मजूरांच्या वतीने मोदी यांच्याशी संवाद साधला.
काय म्हणाले मजूर?
बिहार मधील राहिवासी असलेल्या सबा अहमद या मजुराने सांगितले की, ते इतक्या दिवस बोगद्यात अडकलेले होते पण त्यांना काही भीती वाटली नाही. आम्ही भावंडांप्रमाणे राहत होतो. रात्री जेवणानंतर बोगद्यात फिरायला जात होतो. मी सर्वांना सकाळी मॉर्निंग वॉक आणि योगा करण्यासाठी प्रोत्साहित करत होतो. हा बोगदा 2 किमीचा होता मग त्यात योगा, मॉर्निंग वॉक करणे शक्य होत होते. तसेच मी उत्तराखंड सरकार आणि मुख्यमंत्री धामी यांचे आभार मानतो.
CAA ची अंमलबजावणी करणारच, कोणीही रोखू शकणार नाही; अमित शाहांचं मोठं विधान
तसेच यावेळी या मजुरांचं नेतृत्व करणारा गब्बर सिंह याने पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधला तेव्हा मोदी त्यांना म्हणाले की, तुम्हाला विशेष शुभेच्छा मुख्यमंत्री धामी रोज सांगत होते की, तुम्ही दोघांनी खूप चांगलं नेतृत्व केलं. तर यावर गब्बर सिंह म्हणाले की, तुम्ही म्हणज पंतप्रधानांनी आमची उत्साह वाढवला. मुख्यमंत्री धामी आमच्या सातत्याने संपर्कात होते. कंपनीने देखील काहीही कमतरता भासू दिली नाही.
तसेच यावेळी पंतप्रधान मोदी यांनी या मजुरांचं नेतृत्व करणाऱ्यांचं कौतुक केल्यानंतर त्यांनी रस्ते वाहतुक आणि महामार्ग राज्य मंत्री जनरल सेवानिवृत्त वी के सिंह यांचं ही कौतुक केलं आहे. तर काल मोदी यांनी ट्वीटमध्ये देखील म्हटल होतं की, उत्तर काशीमध्ये आपल्या बांधवांचं रेस्क्यू ऑपरेशनचं हे यश भावूक करणारं होतं. टनलमध्ये जे लोक अडकलेले होते. त्यांना मी सांगू इच्छितो की, तुमचं साहस आणि धैर्य प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे. मी तुमच्या सगळ्यांचं हित आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतो.