पुणे महापालिका करणार मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार; आगामी निवडणुकीसाठी भाजपची ‘आयडिया’

पुणे महापालिका करणार मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार; आगामी निवडणुकीसाठी भाजपची ‘आयडिया’

पुणे : महापालिकेकडून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या (Modi Government) योजनांची जनजागृती करण्यासाठी आणि त्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ हा उपक्रम महापालिकेकडून हाती घेण्यात आला आहे. पुढील दोन महिन्यांसाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. (Various schemes of Central Government will be promoted by Pune Municipal Corporation.)

महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या उपस्थितीत या यात्रेला नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे.

ललित पाटील ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट; सुषमा अंधारे यांना नाशिकमधून निनावी पत्र…

दरम्यान, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपकडून एक प्रकारे मोदी सरकारच्या प्रचारासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. येत्या मार्च-एप्रिल महिन्यात लोकसभेची आगामी निवडणूक (Loksabha Election) होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग सर्वच राजकीय पक्षांनी फुंकले आहे. प्रत्येक पक्ष पक्ष प्रचारासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा, योजनेचा अवलंब करत आहे. अशात पुणे महापालिकेकडून या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

काय होणार?

शहरातील 125 ठिकाणी फिरत्या वाहनाच्या माध्यमातून नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करणे, जनजागृती करणे, योजनांचा लाभ मिळवून देणे अशी कामे करण्यात येणार आहेत. महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी फिरते वाहन तीन तास थांबणार आहे. या वाहनाचे आणि त्यासंबंधित इतर सर्व नियोजन क्षेत्रीय कार्यालयाकडे देण्यात आले आहे. याबरोबरच महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नियमित आरोग्य तपासणी, विविध चाचण्या, मधुमेह, रक्तक्षय तपासणी केली जाणार आहे.

मोदी लाटेत निवडून येणे सोपे राहिलेले नाही; मावळची जागा राष्ट्रवादीचीच! शेळकेंनी ठोकला शड्डू

यात पंतप्रधान स्वनिधी शिबिर, प्रधानमंत्री आयुष्यमान योजना, आधार अद्यायावतीकरण, उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेअंतर्गत नवीन अर्जांची नोंदणी, पात्र विक्रेत्यांची यादी अंतिम करणे, प्रलंबित कर्ज प्रकरणे, गरीब कुटुंबातील लाभार्थ्यांना सरकारी आणि खासगी रुग्णालयामध्ये विनामूल्य उपचारासाठी आयुष्यमान कार्ड उपलब्ध करून देणे अशी कामे केली जाणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube