मोठी बातमी! व्ही. डी. सतीशन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री

केरळमध्ये काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा करण्यात आली असून वीडी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री होणार आहे. 

V.D. Satheesan

V.D. Satheesan

V.D. Satheesan  : केरळमध्ये काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या नावाची घोषणा करण्यात आली असून व्ही. डी. सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री होणार आहे. केरळ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर केरळचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. आज काँग्रेसने तब्बल दहा दिवसांच्या विचारमंथनानंतर केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून व्ही.डी. सतीशन यांच्या नावाची घोषणा केली आहे. गुरुवारी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुकुल वासनिक, दीपा दास मुन्शी आणि अजय माकन यांनी ही घोषणा केली.

व्ही.डी. सतीशन (V.D. Satheesan) हे सहा वेळा निवडून आलेले आमदार आहेत. केरळच्या मुख्यमंत्री पदासाठी व्ही.डी. सतीशन आणि काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) के.सी. वेणुगोपाल (K.C. Venugopal) यांच्या नावाची चर्चा होती. व्ही.डी. सतीशन यांनी आतापर्यंत केरळ विधानसभेत विरोधी पक्षाचा आवाज म्हणून काम पाहिले असून, विरोधी पक्षनेत्याची भूमिका समर्थपणे पार पाडली आहे. पक्ष संघटनेवरही त्यांची मजबूत पकड असल्याचे मानले जाते. याच कारणांमुळे, पक्षाच्या नेतृत्वाने आता त्यांना केरळच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान करण्याचा निर्णय घेतला आहे.

व्ही.डी. सतीशन कोण आहेत?

कोचीजवळील नेटूर येथे जन्मलेले व्ही.डी. सतीशन हे अशा कुटुंबातून येतात, ज्याचे काँग्रेस पक्षाशी दीर्घकाळापासूनचे संबंध आहेत. वकील आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम केल्यानंतर, सतीशन यांनी ‘केरळ स्टुडंट्स युनियन’ (KSU) च्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला आणि काँग्रेस पक्षात आपले स्थान हळूहळू अधिक बळकट केले. एक प्रभावी वक्ते आणि तळागाळातील राजकारणात जोमाने सहभागी होण्यास सक्षम असलेले नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सतीशन यांनी, 2001 पासून ‘परावूर’ विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे.

‘किंग कोहली’ चा आणखी एक विक्रम; T20 क्रिकेटमध्ये14,000 धावांचा टप्पा पार-

केरळ विधानसभा निवडणूक निकाल 2026

काँग्रेस आघाडी (UDF): 96

डावी आघाडी (LDF): 42

भाजपा (NDA): 02

Exit mobile version