मतदारांनी काँग्रेसचे हिंदू उमेदवारही नाकारले; आसाम, केरळ अन् बंगालच्या निकालांनी उडवली झोप!

Congress हिंदू बहुल बालेकिल्ल्यात गौरव गोगोईंचा पराभव, हा 'ब्रँड काँग्रेस'वरील हिंदू मतदारांच्या अविश्वासाचा शिक्कामोर्तब आहे.

  • Written By: Published:
Congress

Congress Loos Hindu Candidate In Assam Kerala & Bangla Election :  2026 च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेससाठी केवळ राजकीय पराभव नसून, पक्षाच्या सामाजिक ढासळत्या पायाचे भीषण वास्तव मांडणारे ठरले आहेत. आसाम, केरळ आणि पश्चिम बंगालमधील निवडणूक आकडेवारीचे विश्लेषण केले असता, काँग्रेसची अवस्था आता केवळ एका विशिष्ट मतपेढीपुरती मर्यादित झाल्याचे दिसून येत आहे. या राज्यांत हिंदू मतदारांनी केवळ काँग्रेसलाच नाकारले नाही, तर पक्षाने उभे केलेले हिंदू उमेदवारही सपशेल अपयशी ठरले आहेत.

पश्चिम बंगाल, आसाम, पद्दुचेरी भाजपमय! ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल म्हणजे काँग्रेससाठी केवळ राजकीय पराभव नसून, पक्षाच्या सामाजिक अस्तित्वाचा पाया ढासळत असल्याचे सर्वात भीषण संकेत आहेत. आसाम, केरळ आणि पश्चिम बंगालमधील निवडणूक आकडेवारीचे सखोल विश्लेषण केले असता एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. काँग्रेसची व्होट बँक आता केवळ विशिष्ट मतपेढीपुरती मर्यादित झाली असून, हिंदू मतदारांनी तर, पक्षाकडे पाठ फिरवलीच आहे, पण काँग्रेसने मैदानात उतरवलेले हिंदू चेहरेही सपशेल नाकारले गेल्याचे चित्र या राज्यांत पाहायला मिळत आहे.

भाजपसाठी नितीन नबीन लकी ठरले! अध्यक्ष होताच ममतांचा गड भेदत आसाममध्येही केली हॅट्रीक, वाचा नबीन यांचा प्रवास

आसाम : गौरव गोगोईंचा पराभव आणि बदललेले समीकरण

आसाममध्ये काँग्रेसने एकूण 19 जागांवर विजय मिळवला, परंतु या विजयाचा अंतर्भाव केल्यास धक्कादायक माहिती समोर येते. या 19 पैकी 18 आमदार हे मुस्लिम समुदायाचे आहेत. काँग्रेसचा प्रमुख चेहरा आणि आसाम काँग्रेसचे अध्यक्ष गौरव गोगोई यांचा त्यांच्या स्वतःच्या हिंदू बहुल मतदारसंघात झालेला पराभव हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. Congress Loos Hindu Candidate In Assam Kerala & Bangla Election

काँग्रेसचे एकमेव हिंदू आमदार प्रदीप सरकार हे अभयपुरी दक्षिण मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र, या विजयामागेही ‘अल्पसंख्याक’ मतांचाच मोठा वाटा आहे. या मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या 60% पेक्षा जास्त आहे. म्हणजेच, आसाममध्ये काँग्रेसच्या हिंदू उमेदवाराला निवडून येण्यासाठी हिंदू मतांपेक्षा मुस्लिम मतदारांच्या कौलावर अवलंबून राहावे लागले आहे. उर्वरित 18 जागा जनेइया, धुब्री आणि जलेश्वर सारख्या 80 % हून अधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या पट्ट्यातून आल्या आहेत.

केरळ आणि बंगाल : हिंदू मतदारांचा अविश्वास

केरळमध्ये युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला (UDF) 63 जागा मिळाल्या असल्या तरी, त्यातील सामाजिक समतोल ढासळलेला दिसत आहे. 63 पैकी 58 आमदार हे ख्रिश्चन (46) आणि मुस्लिम (12) समुदायाचे आहेत. 92 हिंदू बहुल मतदारसंघांपैकी तब्बल 87 ठिकाणी काँग्रेसच्या हिंदू उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. येथे हिंदू मतदारांनी काँग्रेसऐवजी डावी आघाडी (LDF) किंवा भाजपला पसंती दिल्याचे स्पष्ट झालयं.
पश्चिम बंगालमध्ये तर, परिस्थिती अधिकच गंभीर आहे. बंगालमध्ये काँग्रेसचा एकही हिंदू उमेदवार विधानसभेत पोहोचू शकलेला नाही, जे हिंदू मतदारांच्या पूर्णतः तुटलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. भाजपने 206 जागांसह सत्ता मिळवली असताना, काँग्रेसला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागलंय. राणीनगरमधून झुल्फिकर अली आणि फराक्कामधून मोताब शेख हे दोनच आमदार निवडून आले आहेत. या दोन्ही मतदारसंघांत मुस्लिम लोकसंख्या 70 ते 80 टक्क्यांच्या दरम्यान आहे.

Tamil Nadu : ‘थलपथी’ चा विजयी मावळा! 5 वेळा आमदार राहिलेल्या दिग्गजाला रिक्षाचालकाने पाडले

अस्तित्वाचा संघर्ष

या निकालांनी काँग्रेसच्या धोरणात्मक त्रुटी चव्हाट्यावर आणल्या आहेत. केवळ ‘अल्पसंख्याक’ मतपेढीच्या जोरावर काँग्रेस राष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करू शकत नाही, हे या आकडेवारीने स्पष्ट केले आहे. पक्षाचे हिंदू उमेदवार स्वतःच्याच समाजात अविश्वास का निर्माण करत आहेत? हा प्रश्न आता काँग्रेसच्या हायकमांडला सतावणार आहे. जर काँग्रेसला आपली ‘राष्ट्रीय’ ओळख वाचवायची असेल, तर केवळ सत्ता समीकरणांच्या मागे न धावता, आपल्या मूळ आणि पारंपरिक हिंदू मतदारांमध्ये पुन्हा विश्वास निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे.

follow us