केरळच्या मुख्यमंत्रिपदाची लढाई काँग्रेससाठी जिकारीची; तीन दिग्गजांमध्ये टफ फाइट…

Congress-मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा तीव्र झाल्यानंतर काँग्रेसच्या हायकमांडने केरळचे आमदार आणि मित्रपक्षांशी सल्लामसलत सुरू केलीय. तीन ज्येष्ठ नेत्यांच्या गटांनी या पदासाठी लॉबिंग सुरू केलीय.

Keral Cm Post

Kerala CM post: तमिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये मोठे धक्के बसलेल्या काँग्रेसने (Congress) केरळमध्ये सत्ता आणलेली आहे. परंतु मुख्यमंत्रिपदासाठी विद्यमान विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन (V D Satheesan) माजी विरोधी पक्षनेते के. सी. वेणुगोपाल (ICC general secretary K C Venugopal) आणि काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी रमेश चेन्नीथला या तीन दिग्गजांमध्ये कडवे आव्हान निर्माण झाले आहे. वेणुगोपाल यांच्यासोबत आमदार आहेत. परंतु पक्षाचे कार्यकर्ते ही सतीशन यांना मुख्यमंत्रिपदी बसविण्याची मागणी केलीय. तर रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) हे ज्येष्ठ नेते असून, त्यांना मुख्यमंत्री पद द्यावे, अशी मागणी त्यांचे समर्थक आमदार करत आहेत.


दादांचं अपूर्ण स्वप्न वहिनी पूर्ण करतील; 2029 ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यासह बारामतीतून लढणार? जय पवारांचं मोठं विधान

मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा तीव्र झाल्यानंतर काँग्रेसच्या हायकमांडने केरळचे आमदार आणि मित्रपक्षांशी सल्लामसलत सुरू केलीय. तीन ज्येष्ठ नेत्यांच्या गटांनी या पदासाठी लॉबिंग सुरू केलीय. त्यामुळे काँग्रेस विधिमंडळ पक्षाने गुरुवारी एक बैठक घेतलीय. ज्यामध्ये पक्षाचा नेता कोण असेल याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या (AICC) अध्यक्षांकडे सोपवणारा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे हे या पदाचा निर्णय घेणार आहे.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडीने (UDF) केरळमधील विधानसभा निवडणुकीत 140 पैकी 102 जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. त्यात काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक 63 जागा आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदही काँग्रेसला मिळणार आहे. परंतु मुख्यमंत्रिपद कुणाला द्यायच्या यावरून काँग्रेसमध्ये तीव्र स्पर्धा आहे. केरळचे विद्यमान विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन, माजी विरोधी पक्षनेते रमेश चेन्नीथला आणि काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्यामध्ये तीव्र स्पर्धा आहेत. आता AICCचे निरीक्षक मुकुल वासनिक आणि अजय माकन हे काँग्रेसच्या आमदारांसोबत बैठक घेतली आहे. या तिन्ही दावेदारांशी निष्ठा असलेले अनेक ज्येष्ठ नेतेही निरीक्षकांना भेटले आहेत.

भुजबळ, परांजपे की आणखी कोणी ? राज्यसभेवर जाण्यासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच…


यूडीएफच्या सहकारी पक्षांचे वजन सतीशन यांच्या पारड्यात

सतीशन यांचे काँग्रेस वाढविण्यात मोठे योगदान आहे. पाच वर्षांपासून ते यूडीएफचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे निवडणुकीत आघाडीच्या यशाचे मुख्य शिल्पकार सतीशन आहेत. त्यामुळे त्यांना हे पद द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे. तर आमदार हे वेणुगोपाल यांच्या बाजूने आहेत. मुख्य स्पर्धा ही वेणुगोपाल आणि सतीशन यांच्यामध्ये आहेत. तर अनुभवी नेता म्हणून चेन्नीथला यांची निवड करावी, अशी मागणी होत आहे. चेन्नीथला यांचे दिल्ली दरबारी वजन आहे. ते महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस प्रभारी आहेत. वेणुगोपाल हे राष्ट्रीय स्तरावर केरळमधील शक्तिशाली नेते आहेत. ते राहुल गांधींच्या जवळचे मानले जातात. वेणुगोपाल यांनी केरळमधील निवडणुकीसाठी निधीही उभारला होता.


मित्रपक्षांचा पाठिंबा कुणाला ?

यूडीएफमधील काँग्रेसचा सर्वात महत्त्वाचा मित्रपक्ष असलेल्या इंडियन युनियन मुस्लिम लीगने सतीशन यांना पाठिंबा दिलाय. त्यामुळे वेणुगोपाल यांच्या समर्थक आमदारांच्या गोटात खळबळ उडालीय. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक यूडीएफमधील काँग्रेसच्या कनिष्ठ मित्रपक्षांच्या नेत्यांनाही भेटले आहेत. केरळ काँग्रेस (जोसेफ) पक्षही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सतीशन यांना पाठिंबा देत आहे.

follow us