अंदमान निकोबार येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Savarkar) यांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. तसंच सावरकरांची लेखणी आणि ‘सागरा प्राण तळमळला’ या कवितेला 116 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या कार्यक्रमाय आयोजन करण्यात आलं होतं.
अंदमान निकोबार येथील या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, सावरकरांची भूमिका साकारणारा सिनेअभिनेता रणदीप हुड्डा,शरद पोंक्षे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शाह यांचा हा दुसरा अंदमान निकोबार दौरा असून यापूर्वी यापूर्वी त्यांनी जानेवारी 2023 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 126 व्या जयंती निमित्त आले होते. तर मोहन भागवत यांनी सरसंघचालकपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी पुकारलेल्या लढ्यावेळी त्यांना तत्कालीन इंग्रज सरकारनं अंदमान निकोबारमध्ये काळापाण्याची शिक्षा भोगण्यासाठी पाठवलं होतं. त्यावेळी त्यांनी शिक्षा भोगत असतानाच ज्या काही अजरामर कवितांच्या रचना केल्या, त्यापैकीच एक म्हणजे ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला ही एक आहे.
शशी थरूर यांनी नाकारला वीर सावरकर पुरस्कार, नेमकं कारण काय?
भाजपची मातृसंस्था म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख राहिली आहे. पण याच संघाच्या सरसंघचालकांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात राजकीय पक्षांबाबतची आपली भूमिका स्पष्ट करताना केलेल्या विधानामुळे भाजपची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वीच खळबळजनक विधान केलं होतं. भागवत यांनी त्यावेळी संघ कोणत्याही व्यक्ती किंवा राजकीय पक्षाचे समर्थन करत नाही,तर धोरणांचे समर्थन करतो. आम्ही कोणा एका पक्षाचे समर्थन करत नसून धोरणांचं समर्थन करतो. आम्ही राष्ट्रनीतीचे समर्थक आहोत,राजनीतीचे नाही,असं म्हटलं होतं.
आम्ही निवडणुकीच्या राजकारणात सहभाग घेत नाही.संघ समाजाला एकजुट करण्याचे काम करतो आणि राजकारण विभाजनकारी असेत.आम्ही धोरणाचे समर्थन करतो.याचे उदाहरण द्यायचे झाले तर, आम्हाला अयोध्येत राम मंदिर हवं होतं.त्यामुळे आमचे स्वयंसेवक त्याच्या उभारणीसाठी उभे राहिले. भाजपने हा मुद्दा उचलून धरला.जर काँग्रेसनेही याचं समर्थन केलं असतं तर आमच्या स्वयंसेवकांनी त्या पक्षाला मते दिली असती, असंही भागवत यांनी यावेळी म्हटलं होतं.
सरसंघचालक यांनी नवी भूमिका मांडतानाच कोणत्याही एका विशिष्ट पक्षासोबत आमचे विशेष संबंध नाहीत. कोणताही एक पक्ष आमचा नाही,सर्व पक्ष आमचे आहेत,कारण ते भारतीय पक्ष आहेत. आमचे काही विचार आहेत.देश एका विशिष्ट दिशेने पुढे जावा,असं आम्हाला वाटतं.जे लोक देशाला त्या दिशेनं पुढे घेऊन जातील, आम्ही त्यांचं समर्थन करू, असं परखड मतही भागवत यांनी व्यक्त केलं होतं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक आदरणीय डॉ. मोहन भागवत जी, स्वातंत्र्यवीर सावरकर जी द्वारा रचित कविता ‘सागरा प्राण तळमळला’ के 115 वर्ष पूर्ण होने पर श्री विजयपुरम में आयोजित कार्यक्रम को संबोधित कर रहे हैं… https://t.co/qEHFAWXgEm
— Amit Shah (@AmitShah) December 12, 2025
स्वातंत्र्यवीर सावरकर जी का ‘सागरा प्राण तळमळला’ गीत आज भी रोम-रोम में माँ भारती के प्रति कर्त्तव्य की भावना भर देता है। इस अमर कृति के 115 वर्ष पूर्ण होने पर श्री विजयपुरम (अंडमान और निकोबार) में आयोजित कार्यक्रम से लाइव… https://t.co/jFGJAeTcKV
— Amit Shah (@AmitShah) December 12, 2025
