Download App

मोठी बातमी! राहुल गांधी खासदारकीचा राजीनामा देणार, प्रियांका गांधी लढणार पोटनिवडणूक

काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाड मतदारसंघाचा ( Wayanad Constituency) राजीनामा देणार आहेत.

  • Written By: Last Updated:

Rahul Gandhi : यंदा काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केरळमधील वायनाड (Wayanad) लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. मात्र, आता ते वायनाडचा राजीनामा देणार आहेत. राहुल गांधी आता उत्तर प्रदेशातील रायबरेल मतदारसंघातून खासदार होणार आहेत.

महाराष्ट्राचा आनंद सोहळा आषाढीत अनिकेत शोधतोय विठुरायाला; ‘या’ दिवशी येणार चित्रपट 

राहुल गांधी 2019 मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठीमधून पराभूत झाले होते. त्यामुळं यंदा त्यांनी वायनाडमधून निवडणूक लढवली होती. याशिवाय त्यांनी रायबरेली मतदारसंघातून देखील निवडणूक लढवली होती. या दोन्ही मतदारसंघातून ते बहुमताने निवडून आले आहेत. त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या आजच्या बैठकीत देशातील सर्वात मोठ्या राज्यावर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती आखण्यात आल्यानं राहुल गांधींनी वायनाडचा राजीनामा देऊन रायबरेलीचे खासदार राहावे, असे ठरलं ठरलं. त्यामुळं राहुल गांधींनी वायनाडची जागा सोडण्याचा निर्णय घेतला.

Chhagan Bhujbal यांची भूमिका ठरली; मोदींकडे मोठी मागणी करत, हाकेंसोबत मैदानात उतरणार 

राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडल्यानंतर आता प्रियांका गांधी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ही माहिती दिली आहे. तसेच वायनाडची जागा सोडताना राहुल गांधी यांनी वायनाडच्या जनतेचे आभार मानले आहेत. प्रियांका गांधी त्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याने आम्ही जनतेला दिलेले वचन पूर्ण करू, असेही राहुल गांधी म्हणाले.

काय म्हणाले राहुल गांधी?
आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना राहुल गांधी म्हणाले की, वायनाड आणि रायबरेलीशी माझे भावनिक नाते आहे. मी गेली ५ वर्षे वायनाडचा खासदार होतो. येथील लोकांचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आता प्रियांका गांधी वाड्रा वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत, पण मी अधूनमधून वायनाडला भेट देत राहीन, असं ते म्हणाले.

तर प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या, वायनाडचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे आणि मी त्यांना राहुल गांधींची उणीव भासू देणार नाही. मी कठोर परिश्रम करून एक चांगली प्रतिनिधी बनण्याचा प्रयत्न करेन. मला रायबरेली आणि अमेठीबद्दल खूप आदर आहे. मी रायबरेलीतील माझ्या भावाला मदत करेन त्याचबद्दल वायनाडमधील लोकांची देखील सेवाही करेन, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.

follow us