Wayanad Lok Sabha Result 2024 : वायनाडमध्ये पुन्हा राहुल गांधी? लीड 1 लाखाच्या पुढे

Wayanad Lok Sabha Result 2024 : वायनाडमध्ये पुन्हा राहुल गांधी? लीड 1 लाखाच्या पुढे

Wayanad Lok Sabha Result 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघात (Wayanad Lok Sabha Result 2024) पुन्हा एकदा राहुल गांधी विजय होण्याच्या मार्गावर आहे.

समोर आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघात 1,24,739 मतांनी आघाडीवर आहे. यावेळी राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघासह उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघातून देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. रायबरेली मतदारसंघातून देखील राहुल गांधी 50 हजारपेक्षा जास्त मतांनी आघाडीवर आहे.

तर दुसरीकडे ECI च्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार

मंडी लोकसभा मतदारसंघात कंगना राणावत 6000 मतांनी आघाडीवर आहे.

बीडमध्ये बजरंग सोनवणे 8956 मतांनी आघाडीवर आहे.

यूपीच्या अमेठीमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी 10 हजार मतांनी मागे आहेत.

तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे 7 हजार मतांनी पुढे आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे 33000 मतांनी आघाडीवर आहे.

शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरेंची आघाडी; महायुतीचे सदाशिव लोखंडे पिछाडीवर

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज