Download App

Weather Update: दिल्ली-NCR मध्ये पाऊस, आसाम, राजस्थानमध्ये पूर, असे असेल आजचे हवामान

  • Written By: Last Updated:

Weather Update: बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार माजवला आहे. आता या वादळाचा प्रभाव राजस्थान, आसाम तसेच इतर राज्यांमध्ये दिसून येत आहे. राजस्थानमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे, तर आसाममधील तीन जिल्हे पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेशात पावसाने दडी मारल्यानंतर लोकांना दिलासा मिळाला आहे, मात्र असे असतानाही काही राज्यांमध्ये उष्णतेची प्रक्रिया सुरूच आहे. (weather-update-biparjoy-19-june-2023-rajasthan-assam-delhi-ncr-uttar-pradesh-bihar-jharkhand)

हवामान विभागाने सांगितले की, येत्या दोन दिवसांत बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. म्हणजेच येत्या दोन दिवसांत या राज्यांना उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो. दिल्लीत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रविवारी येथे कमाल तापमान 38.6 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 28.6 अंश सेल्सिअस होते, जे हंगामाच्या सामान्य तापमानापेक्षा एक अंश जास्त आहे. आयएमडीने सोमवारी राष्ट्रीय राजधानीत ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

आसाम आणि राजस्थानमध्ये अशी असेल स्थिती

आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीचा कहर सुरूच आहे. आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून येत्या 5 दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील तीन जिल्हे पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. एवढेच नाही तर संपूर्ण आसाममध्ये 25 गावे पुराच्या पाण्याखाली गेली असून 215.57 हेक्टरवरील पिके नष्ट झाली आहेत. तसेच राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये 37,535 लोकांना पुराचा फटका बसला आहे. त्याचवेळी राजस्थानमध्येही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राजस्थानमधील जालोर, सिरोही आणि बारमेर जिल्ह्यांमध्ये, चक्रीवादळ बिपरजॉयमुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे लोकांना पूरसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. SDRF च्या टीमने 59 लोकांना सुरक्षित स्थळी नेले आहे.

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू होणार, ‘ही’ असेल कायदा तरतूद

या राज्यांमध्ये तीव्र उष्णतेचा प्रकोप

अशी काही राज्ये आहेत ज्यांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. उत्तर प्रदेशातील पूर्वांचलमध्ये उष्णतेचा प्रकोप सुरूच आहे. बलियामध्ये उष्माघाताने मृतांचा आकडा वाढत आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या 57 मृत्यूंनी संपूर्ण जिल्हा हादरला आहे. यूपी, बिहारमध्ये उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. दोन्ही राज्यांमध्ये 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इतकेच नाही तर बिहारच्या नवादा येथे उष्णतेची लाट आणि उष्णतेमुळे 24 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, त्यानंतर 24 जूनपर्यंत सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. येथे तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. बिहारमध्ये पुढील दोन दिवस कडक उन्हाचा इशारा देण्यात आला असून, त्यानंतर दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच सोमवारी पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Tags

follow us