Download App

शेतकऱ्यांनो, गुड न्यूज! जुलैमध्ये धो धो पाऊस, जाणून घ्या ताजे अपडेट

Weather Update : आजपासून जुलै (July) महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय हवामान विभागाने (IMD) एक मोठी

Weather Update : आजपासून जुलै (July) महिन्याची सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय हवामान विभागाने (IMD) एक मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे. हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा (Mrityunjay Mohapatra) यांनी जुलै महिन्यात संपूर्ण देशात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवली आहे.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात ईशान्य भारतातील काही भाग आणि उत्तर-पश्चिम, पूर्व आणि दक्षिण-पूर्व द्वीपकल्पीय भारतातील काही भाग वगळता देशात सामान्यपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. तसेच वायव्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात ढगाळ वातावरणामुळे देशात किमान तापमान जास्त राहणार आहे.

1901 नंतर उत्तर-पश्चिम भारतात गेल्या महिन्यात सरासरी 31.73 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ते सर्वात उष्ण होते. असं देखील हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा म्हणाले.

याच बरोबर हवामान विभागाचे प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी जूनमधील पावसाची देखील माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात जून महिन्यात 147.2 मिमी पाऊस पडला. तर सामान्य पाऊस 165.3 मिमी आहे. त्यामुळे 2001 नंतर हा सातवा सर्वात कमी पावसाचा महिना ठरला. 11 जून ते 27 जून या 16 दिवसांत देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.

तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह देशातील तब्बल 25 राज्यांमध्ये पुढील पाच दिवसांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. यामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल, पंजाब, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, बिहार, झारखंड, दक्षिण आणि उत्तर-पूर्व या राज्यांचा समावेश आहे.

विभागानुसार, येत्या 5 दिवसांत केरळ,महाराष्ट्रा, लक्षद्वीप, किनारी कर्नाटक, गोवा, गुजरात या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र, किनारी आंध्र प्रदेश, यानम, मराठवाडा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, रायलसीमा, तेलंगणा, उत्तर आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात अतिवृष्टी अपेक्षित आहे. तर 2 ते 4 जुलै दरम्यान गुजरातच्या इतर भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! मुंबई पदवीधर मतदारसंघात ‘ठाकरे’ राज, अनिल परब विजयी

तर 2 आणि 4 जुलै रोजी महाराष्ट्रातील खोऱ्यात, 2 आणि 3 जुलै रोजी कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडू शकतो. अशी माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.

follow us