Download App

बृजभूषण सिंह यांना मोठा धक्का, कुस्ती महासंघाच्या कार्यालयाचा पत्ता बदलला

Brijbhushan Singh : ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट (Vinesh Phogat) यांच्यासह अनेक अव्वल कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. बृजभूषण यांच्यावर कारवाईची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतरवर अनेक दिवस आंदोलन केले होते. मात्र तरीही भारतीय कुस्ती महासंघाचे कार्यालय बृजभूषण सिंह यांच्या निवासस्थानी सुरुच होते. आता क्रीडा मंत्रालयाने याची दाखल घेत भारतीय कुस्ती महासंघाचे कार्यालय बृजभूषण यांच्या निवासस्थानावरून हटवण्यात आले आहे. WFI चे नवीन कार्यालय नवी दिल्लीतील हरी नगर भागात झाले आहे.

24 डिसेंबर रोजी क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन केलेल्या WFI पॅनेलला निलंबित केले होते. संजय सिंह यांची WFI अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तीन दिवसांनी मंत्रालयाने हे पाऊल उचलले होते. बृजभूषण यांच्या निवासस्थानापासून सुरू असलेले कार्यालय हेही या कठोर कारवाईमागे एक कारण असल्याचे सांगण्यात आले.

मंत्रालयाने आपल्या पत्रात म्हटले आहे की, फेडरेशनचे कामकाज माजी पदाधिकारी (बृजभूषण) यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या जागेतून चालवले जात आहे. खेळाडूंच्या लैंगिक छळाचे आरोप ज्या ठिकाणी झाले, तो कथित परिसर हाच आहे. सध्या न्यायालय या प्रकरणाची चौकशी करत आहे. मंत्रालयाने असेही म्हटले होते की नवीन पॅनेल माजी (WFI) अधिकार्‍यांच्या पूर्ण नियंत्रणाखाली काम करत होता. हे राष्ट्रीय क्रीडा संहितेच्या नियमानुसार नव्हते.

जागा वाटपावरून काँग्रेस-शिवसेनेत घमासान! वादात आता मिलिंद देवरांचीही उडी…

बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीगीरांचे आंदोलन
ऑलिम्पिक पदक विजेती साक्षी मलिक आणि जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट यांच्यासह अनेक अव्वल कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. या प्रकरणाची दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया, साक्षी आणि विनेशसह अनेक कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्यावर कारवाईची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतरवर अनेक दिवस आंदोलन केले होते.

Lok Sabha elections : महाविकास आघाडीचं ठरलं! जागा वाटपाचा निर्णय कॉंग्रेस हायकमांड, पवार अन् ठाकरे घेणार

21 डिसेंबर रोजी बृजभूषण यांच्या जवळचे मानले जाणारे संजय सिंह यांची WFI च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याची घोषणा केली होती, तर बजरंगने त्याचे पद्मश्री परत केले आणि विनेश फोगटने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने पुन्हा एकदा वुशू असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुख भूपेंद्र सिंग बाजवा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्यांच्याकडे कुस्ती महासंघाचा कारभार दिला आहे.

follow us