जागा वाटपावरून काँग्रेस-शिवसेनेत घमासान! वादात आता मिलिंद देवरांचीही उडी…

जागा वाटपावरून काँग्रेस-शिवसेनेत घमासान! वादात आता मिलिंद देवरांचीही उडी…

Milind Devra On Sanjay Raut : देशात पुढील काही दिवसांत आगामी लोकसभा होऊ घातल्या आहेत. अशातच सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीतील दोन पक्षामध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरुन जोरदार घमासान सुरु असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेकडून 23 जागांवर दावा ठोकण्यात आलायं तर या दाव्याला काँग्रेस नेत्यांकडून विरोध होताना दिसत आहे. अशातच आता काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा (Milind Devra) यांनीही उडी घेत राज्यात काँग्रेसच सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याचं म्हटलं आहे. त्यावरुन आता शिवसेना-काँग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगणार असल्याचं बोललं जात आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मागील निवडणुकीत जिंकलेल्या 23 जागांवर दावा केला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव राऊत यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांकडे मांडला आहे. काँग्रेसने 0 जागांपासून सुरुवात करुन चर्चा केली पाहिजे, असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे. यासोबतच संजय राऊतांनी काँग्रेसच्या नेत्यांवर सडकून टीकाही केली आहे. या टीकेला संजय निरुपम यांनी शिवसेनेला जोरदार टीका प्रत्युत्तर दिलं आहे. जर शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढवल्या तर एकही जागा जिंकू शकणार नसल्याचं भाकीत निरुपम यांनी केलं आहे. अशातच आता मिलिंद देवरांनीही यावर भाष्य केलं आहे. मिलिंद देवरा यांनी यासंदर्भातील एक्सवर पोस्ट शेअर केली आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार विजयकांत यांची हत्या? दिग्दर्शकाच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सर्वत्र खळबळ

देवरा पोस्टमध्ये म्हणाले, “40 आमदार सोडून गेल्यानंतरही महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत यांना शिवसेना सर्वात मोठा पक्ष वाटत आहे. राऊतांच्या म्हणण्यानूसार काँग्रेसने शून्य जागांपासून चर्चेला सुरुवात केली पाहिजेत, पण राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष असणाऱा काँग्रेस पक्ष विरोधी पक्षाचं नेतृत्व करत आहे”
असं देवरा यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

ठाकरे गट-राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये स्वबळावर निवडणूक लढवतील अशी क्षमता नाही. प्रत्येक पक्षाला एकमेकांचं सहकार्य पाहिजे. शिवेसना एकही जागा स्वबळावर निवडून येऊ शकत नाही. काँग्रेसला ठाकरे गट आणि ठाकरे गटाला काँग्रेसची गरज असून तुम्ही अहंकार मनात ठेऊन बोलू नका, असा चॅलेंजिग अटिट्यूट ठेऊ नका, असाही सल्ला निरुपम यांनी दिला आहे.

दरम्यान, जागावाटपाच्या मुद्द्यावरुन आता महाविकास आघाडीमध्ये चांगलीच घमासान सुरु असल्याचं दिसून येत आहे. संजय राऊतांकडून जागावाटपावरुन काँग्रेसला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर काँग्रेसकडूनही शिवसेनेला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube