Lok Sabha elections : महाविकास आघाडीचं ठरलं! जागा वाटपाचा निर्णय कॉंग्रेस हायकमांड, पवार अन् ठाकरे घेणार
Lok Sabha elections 2024 : पुढील वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडी राज्यात एकत्र येऊन निवडणुका लढवणार आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर जागा वाटपाचा मोठा प्रश्न आहे. कोणाला किती जागा मिळणार याकडेच राज्याचे लक्ष लागले आहे. याच संदर्भात आज दिल्लीत काँग्रेसची केंद्रीय समिती (Congress Central Committee) आणि महाराष्ट्राच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. जागा वाटपाबाबत सर्व निर्णय काँग्रेस हायकमांड, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) ठरवतील, असं या बैठकीत ठरल्यचाी माहिती आहे.
जागा वाटपावरून काँग्रेस-शिवसेनेत घमासान! वादात आता मिलिंद देवरांचीही उडी…
देशभरातील विरोधकांनी मोदी सरकारच्या विरोधात एकवटून इंडिया अलायन्स स्थापन केली आहे. त्यानंतर जागा वाटपाचा मुद्दा स्थानिक पातळीवर चर्चिला जात आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जागा वाटपावरून मविआत एकमत नाही. ठाकरे गट 23 जागा लढवेल, असं संजय राऊतांनी जाहीर केलं.
MPSC कडून पूर्व परीक्षेसाठी जाहिरात प्रसिध्द; पद संख्या अन् अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या…
हायकमांड, पवार अन् ठाकरे जागा वाटप करणार
दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कॉंग्रेसची बैठक झाली. महाराष्ट्रात लोकसभेच्या कोण, किती आणि कोणत्या जागा लढवणार याचाही निर्णय काँग्रेस हायकमांड, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोत चर्चा करून घेण्यात येईल. लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटप प्रक्रियेत काँग्रेसचे राज्यातील महत्वाचे नेते सहभागी होणार नाहीत. जागा वाटप ठरवतांना जिंकण्याची क्षमता हाच एकमेव निकष असणार असल्याच य़ा बैठकीत ठरल्याची माहिती आहे.
आजच्या बैठकीत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी विधानसभा मतदारसंघांबाबतचे अहवाल कॉंग्रेस कमिटीला सादर केला. यामध्ये जिंकण्याची क्षमता हा जागावाटपाचा निकष असणार हे. साधारणत: 8 ते 10 जागांवर वाद होण्याची शक्यता असून इतर जागावाटप सोपे असल्याचा कॉंग्रेसच्या नेत्यांचा अंदाज आहे. तसेच काँग्रेस कमिटी आजच्या बैठकीत महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचे मत हायकमांडला कळवणार आहे.
वंचित गांभीर्याने गोष्टी घेणार नाही
दिल्लीत झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या आघाडी समितीने महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांबाबतची मतं जाणून घेतली. तसेच यावेळी वंचित बाबतचे मत देखील जाणून घेतले. वंचित बहुजन आघाडीचा पूर्वीचा अनुभव पाहता, वंचित फार गांभीर्याने गोष्टी घेणार नसल्याचा महाराष्ट्रातील नेत्यांचा सुर होता. पण, जागावाटपाबाबत सगळे निर्णय मविआतील अन्य दोन पक्षांशी चर्चा करून हायकमांड घेणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यामुळं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची जागा वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. तीन प्रमुख पक्षांसह इतर लहान-मोठे पक्षही मविआत आहेत. त्यामुळं जागावाटपात कुणाला किती जागा मिळणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.