Download App

माजी पंतप्रधानांच्या नातवाचा प्रताप! 3000 सेक्स व्हिडीओ; वाचा, देशाला हादरवणारं सेक्स कँडल

प्रज्वल रेवण्णा सेक्स कँडल प्रकरणात अटक झाली. मात्र, अनेक प्रश्न समोर येतात. काय आहे हे प्रकरण? कसा होता हा घटनाक्रम. वाचा सविस्तर

Prajwal Revanna sex candle case :  देशभरात लोकसभा निवडणुकांच वार सुरू होत. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुराळा उडवून दिला होता. सर्व राजकीय नेते आपली बाजू मांडू वियचाचा गुलाल उधळण्याची भाषा करत होते. (Prajwal Revanna) मतदारांना वेगवेगळी आश्वासन देत होती. (sex candle) हे सगळ सुरू असताना देशभरातील आणि प्रामुख्याने कर्नाटकच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आणि एका फटक्यात राजकीय प्रचार बाजूला होत चर्चेत आरा तो माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा खासदार नातू प्रज्वल रेवण्णा. (Prajwal Revanna) चर्चेत येण्याचं कारण काय तर सेक्स कँडल प्रकरण.

प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकरण! माजी पंतप्रधान एचडी देवेगौडांची पहिली प्रतिक्रिया

हसन लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी लोकसभेसाठी मतदान होणार होतं. दरम्यान, मतदानाच्या पाच दिवस अगोदर म्हणजे 21 एप्रिलला 2,960 व्हिडिओ क्लिप्स असणारे पेन ड्राईव्ह बस स्टॅंड, बागेत आणि इतर ठिकाणी ठेवण्यात आले होते. लोकांच्या घरात, मार्केट, बस स्टॉप आणि रेल्वे स्टेशनवर पेन ड्राईव्ह फेकलेले असतात. जेव्हा हे पेन ड्राईव्ह ओपन करतात आणि त्यामध्ये नेमका काय डाटा आहे पाहतात तेव्हा पाहणाराला मोठा झटका बसतो. कारण या पेन ड्राईव्हमध्ये त्यांच्या मतदारसंघातील विद्यमान खासदार असलेल्या प्रज्वल रेवण्णाचे सेक्स व्हिडीओ असतात. तसंच, व्हिडीओंचा आकडा पाहून कुणाचाही विश्वास बसणार नाही. कारण रेवण्णा यांचे तब्बल 2976 व्हिडीओ त्यामध्ये असतात.

व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले होते. 28 एप्रिल 2024 ला रेवण्णा यांच्या घरी काम करणारी महिला होलेनारासीपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करते. तक्रारीमध्ये, 2019 पासून मी रेवण्णा यांच्या घरी कामाला लागले. ज्यावेळी रेवण्णा यांच्या घरी आले तेव्हा तिथे सहा महिला कामाला होत्या. त्यांनी मला प्रज्वलपासून सावध राहायला सांगितलं. काही दिवसांनी प्रज्वल यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. याची तक्रार त्यांचे वडील एच. डी. रेवण्णा यांना केल्यावर त्यांनीही माझं लैंगिक शोषण केलं होतं. स्टोर रूममध्ये मला घेऊन जात माझ्यावर अत्याचार केला. इतकंच नाहीतर माझी मुलीचाही नंबर घेत तिला रेवण्णा व्हिडीओ कॉल करायचा. आता व्हिडीओ व्हायरल झाल्याचं समोर आल्यावर तक्रार करण्यासाठी माझी हिंमत झाल्याचं पीडित महिलेने म्हटलं होतं.

मोठी बातमी! माजी पंतप्रधानांच्या नातवाला लैंगिक अत्याचार प्रकरणात अखेर अटक

दरम्यान, हे प्रकरण चांगलच तापतय हे लक्षात येताच प्रज्वल रेवण्णानं 27 एप्रिला देश सोडून जर्मनीला पलायन केलं. हसन लोकसभा मतदारसंघातील मतदान संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो फरार झाला होता. त्यानंतर तो तब्बल 31 दिवसांनी पुन्हा भारतात येण्यासाठी निघाला. याबाबत इंटरपोलनं बंगळुरु पोलिसांच्या एसआयटीला प्रज्वल रेवण्णा जर्मनीतून म्युनिक विमातळावरुन निघाल्याची माहिती दिली होती. मग आज 31 मे रोजी मध्यरात्री 12.49 वाजता प्रज्वल रेवण्णाचं विमान बंगळुरु विमानतळावर दाखल झालं. त्यानंतर प्रज्वल विमानतळावर दाखल होताच कर्नाटक पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

follow us