Sex Tape Case : प्रज्वल रेवन्नांच्या अडचणी वाढल्या; SIT ने जगभरात जारी केली लुकआऊट नोटीस
बंगळुरू : कर्नाटकातील कथित सेक्स टेप प्रकरणात जेडीएसचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, SIT ने गुरूवारी (दि.2) रेवन्ना यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. विशेष म्हणजे ही नोटीस जगभरातील सर्व इमिग्रेशन पॉईंटवर जारी करण्यात आली आहे. (SIT Issued Global Lookout Notice Against Prajwal Revanna In Sex Tapes Case)
चालकासोबत भांडण अन् अश्लील व्हिडियोजचा पेन ड्राइव्ह; रेवन्ना सेक्स स्कँडल नेमकं काय?
अश्लील व्हिडिओवरून राजकारण तापण्यास सुरूवात झाल्यानंतर रेवन्ना यांनी भारतातून परदेशात पलायन केले आहे. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारने SIT ची स्थापना केली असून, आता रेवन्ना यांच्याविरोधात SIT ने जगभरातील इमिग्रेशन पॉईंटवर लुकआऊट नोटीस जारी केली आहे. 26 एप्रिल रोजी रेवन्ना जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
रेवन्ना माजी पंतप्रधान देवैगौडा यांचा नातू
ज्या अश्लील व्हिडिओ प्रकरणात रेवन्ना यांचेनाव आले आहे ते देशाचे माजी पंतप्रधान आणि JDS चे प्रमुख एचडी देवेगौडा यांचा नातू असल्याने मोठी खळबळ उडाली असून, रेवन्ना यांनी चौकशीला सामोरे जाण्यासाठी SIT कडे सात दिवसांची मुदत मागितली आहे.
…तर पवारसाहेब 84 वर्षे जगले नसते; अस्वस्थतेवरून राणेंचा खोचक टोला….
स्वयंपाकी महिलेची लैगिंक छळाची तक्रार
एचडी रेवन्ना आणि त्यांचा मुलगा प्रज्वल रेवन्ना या दोघांविरुद्ध होलेनारसीपुरा येथे त्यांच्या घरी काम करणाऱ्या माजी स्वयंपाकी महिलेने लैंगिक छळ केल्याची तक्रार केली असून, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत संबंधित महिलेने आपल्या लैंगिक छळ करण्याबरोबरच मुलीशी व्हिडिओ कॉलवर अश्लील भाष्य केल्याचेही नमुद करण्यात आले आहे.
Look out notice issued against Prajwal Revanna in 'obscene video' case: K'taka Home Minister
Read @ANI Story | https://t.co/bbdC2aOjGC#PrajwalRevanna #Karanataka #GParameshwara #JDS pic.twitter.com/jD2JbEznaQ
— ANI Digital (@ani_digital) May 2, 2024