Download App

राष्ट्रपती राजवट कधी आणि का लागू करण्यात येते, संविधानात तरतुदी काय?

What Is President Rule: गेल्या दोन वर्षांपासून सुरु असणाऱ्या हिंसाचारानंतर आज मणिपूरमध्ये (Manipur) राष्ट्रपती राजवट (President Rule) लागू

  • Written By: Last Updated:

What Is President Rule: गेल्या दोन वर्षांपासून सुरु असणाऱ्या हिंसाचारानंतर आज मणिपूरमध्ये (Manipur) राष्ट्रपती राजवट (President Rule) लागू करण्यात आली आहे. रविवारी 9 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री बिरेन सिंह (N. Biren Singh) यांनी राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्यावर जातीय हिंसाचारानंतर चारही बाजूने टीका होत होती. आता मणिपुरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याने राज्याच्या व्यवस्थेत बदल होणार आहे. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का? राष्ट्रपती राजवट म्हणजे काय आणि कोणत्या परिस्थितीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येत?

कलम 352 मध्ये राष्ट्रपती राजवटबाबत तरदूत 

भारतीय संविधानाच्या कलम 352 मध्ये (Article 352) राष्ट्रपती राजवटबाबत सविस्तर माहिती आणि संपूर्ण तरदूत सांगण्यात आली आहे. कलम 356 मध्ये राज्य आणीबाणींचा समावेश करण्यात आला आहे. जर राष्ट्रपतींना असे वाटत असेल की राज्य सरकार संविधानानुसार काम करत नाही, तेव्हा राष्ट्रपती राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे आदेश देतात. ज्या दिवशी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येतो तेव्हापासून संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 2 महिन्यांच्या आत ते मंजूर करणे आवश्यक असते. यानंतर राज्यपाल राष्ट्रपतींच्या सूचनांनुसार राज्याचा काम पाहतो. याच बरोबर एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्याचे संपूर्ण नियंत्रण राष्ट्रपतींकडे येते.

केंद्र सरकारने यासाठी कार्यकारी अधिकार देखील प्रदान केले आहेत. राज्यपाल निवृत्त नागरी सेवक असलेल्या सल्लागारांचीही नियुक्ती करतात. जर राष्ट्रपती राजवटीला संसदेने मान्यता दिली तर ती सहा महिने टिकू शकते. तथापि, त्याचा कालावधी पुढील 3 वर्षांसाठी सतत 6-6 महिने वाढवता येतो. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात येतो. जेव्हापर्यंत राष्ट्रपती राजवट राज्यात लागू असते तेव्हापर्यंत राज्याची विधेयके आणि अर्थसंकल्पीय प्रस्ताव केवळ संसदेतूनच मंजूर करण्यात येते आणि जर संसदेत अधिवेशन चालू नसेल तेव्हा राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात.

बौद्ध धर्मगुरू दलाई लामा – भाजप खासदार संबित पात्रा यांना मिळणार झेड श्रेणीची सुरक्षा

या परिस्थितीतही राष्ट्रपती राजवट लागू होतो

इतर काही परिस्थितीतही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास, सरकार अल्पसंख्याक झाल्यास आणि स्थिर सरकार स्थापन करण्यात अपयश आल्यास राष्ट्रपती राजवट देखील लागू केली जाऊ शकते. याशिवाय, भ्रष्टाचार, बंडखोरी, आपत्ती किंवा इतर कोणत्याही परिस्थितीमुळे सरकार अपयशी ठरल्यास राष्ट्रपती राजवट देखील लागू केली जाऊ शकते.

follow us