Pasmanda Muslims : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी बोलतांना त्यांनी पसमांदा मुस्लिमांचा (Pasmanda Muslim) उल्लेख केला. ते म्हणाले की, व्होट बॅंकेचे राजकारण करणाऱ्यांनी पसमांदा मुस्लिमांचे जगणे कठीण केलं. त्यांना उद्धवस्त केलं. या पसमांदा मुस्लिमांना आजही समान दर्जा मिळालेला नाही. भठियारा, जोगी, मदारी, तेजा या पसमांदा जातींशी एवढा भेदभाव करण्यात आला की, अनेक पिढ्यांना त्यांचे नुकसान करावे लागले, दरम्यान, मोदींनी उल्लेख केलेले पसमांदा मुस्लिम आहेत तरी कोण? त्यांचा इतिहास काय? याच विषयी जाणून घेऊ. (Who are the Pasmanda Muslims? What is their history?)
मुस्लिम समाजातही जातीयव्यवस्था आहे.अगदी सुरूवातीच्या काळात पसमांदा शब्दाचा वापर एका वर्गासाठी करण्याता आला होता. मात्र, त्यानंतर वर्षानुवर्षे हा शब्द मुस्लिमांमधील इतर मागास जाती, अनुसूचित जाती आणि जमातींसाठी वापरात आला. पसमांदा हा फारसी शब्द आहे, ज्याचा अर्थ सामाजिक, आर्थिकृष्ट्या मागासलेले लोक असता होता. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या मुस्लिमांना पसमांदा म्हणतात. पसमांदा मुस्लिम हे खरे तर ते मुस्लिम आहेत, जे हिंदू समाजातील दलित आणि मागास वर्गातून आले होते आणि या लोकांनी इस्लाम स्वीकारला होता. देशातील मुस्लिमांच्या एकूण लोकसंख्येपैकी, सुमारे ७० ते ८० टक्के लोक हे पसमांदा मुस्लिम आहेत. तर १५ टक्के सुवर्ण मुस्लिम आहेत.
भारतात अरब देश, अफगाणिस्तान आणि मध्य आशियातून आलेले मुस्लिम स्वतःला भारतीय मुस्लिमांपेक्षा श्रेष्ठ समजतात. बाहेरून भारतात स्थायिक झालेल्या अशा मुस्लिमांना अश्रफिया म्हणतात. हे लोक दीर्घकाळ देशाच्या सत्तेवर विराजमान होते. आणि त्यामुळेच त्यांचा समाजावर बराच प्रभाव आहे. स्वातंत्र्यानंतरही मुस्लिमांचे नेतृत्व याच लोकांच्या हाती राहिले. या कारणामुळं स्थानिक पसमांदा मुस्लिम राजकारणात उपेक्षित आहेत.
अली अन्वर यांनी पहिल्यांदा ‘पसमांदा मुस्लिम’ हा शब्दप्रयोग पहिला. जेडीयूच्या तिकिटावर ते दोनदा राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. 1900 च्या दशकात बिहारमध्ये पहिली अखिल भारतीय पाचवारा मुस्लिम संघटना स्थापन झाली. याद्वारे पसमांदा मुस्लिमांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला गेला, जेणेकरून त्यांना एक मोठी राजकीय शक्ती बनवता येईल.
2006 मध्ये राज्यसभेत पोहोचल्यानंतर अली अन्वर यांनी उत्तर प्रदेशातील पसमांदा मुस्लिमांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशबद्दल बोलायचे झाले तर, तिथं पसमांदा फ्रंट सारख्या संघटनांनी मुस्लिमांना एकत्र करण्यासाठी दीर्घकाळ संघर्ष केला आहे. मात्र, उत्तरप्रदेशातील परस्पर मतभेद आणि एकमेकांशी भांडण यामुळे पसमांदा आंदोलनाचा बिहारमध्ये म्हणावा तसा परिणाम दिसून आला नाही.
त्याचवेळी, गेल्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात पसमांदा मुस्लिमांचा वावर दिसून येतो. स्थानिक पातळीवरील निवडणुकांपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांचा प्रभाव दिसून येत आहे. 2002 मध्ये हैदराबाद येथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश पक्षाच्या युनिटला पसमांदा मुस्लिमांना मोठ्या प्रमाणात एकत्र करण्यास सांगितले.