Sunil Kendrekar : कोर्टाने कौतुक केले; सेवेत ठेवण्याचे आदेश दिले… त्यानंतरही शिंदे सरकारचा केंद्रेकरांना नारळ!

Sunil Kendrekar : कोर्टाने कौतुक केले; सेवेत ठेवण्याचे आदेश दिले… त्यानंतरही शिंदे सरकारचा केंद्रेकरांना नारळ!

छत्रपती संभाजीनगर : धडाकेबाज सनदी अधिकारी आणि छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil kendrekar) यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज अखेर स्वीकारण्यात आला आहे.  सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या पत्रानुसार केंद्रेकर यांचा येत्या 3 जुलै रोजी कामाचा अंतिम दिवस असणार आहे. केंद्रेकर यांनी 24 आणि 25 मे रोजी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला होता. तो आज (27 जुन) शासनाने मंजूर केला आहे. (IAS officer Sunil kendrekar retirement application Approved by state Government on 27 june 2023)

दरम्यान, केंद्रेकर यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज स्वीकारु नये असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाला दिले होते. केंद्रेकर उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष आहेत. अध्यक्ष म्हणून ते त्यांचे काम अतिशय उत्तम करत असून त्यांच्या अनुभवाची आणि शिस्तीची या प्रकल्पासाठी गरज आहे, त्यामुळे मार्च 2024 पर्यंत ही योजना अंतिम टप्प्यात येईपर्यंत केंद्रेकर यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मंजूर करु नये असे न्यायालयाने म्हटले होते.

मोठी बातमी! कर्तव्यदक्ष IAS अधिकारी सुनील केंद्रेकरांचा स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय, पण कोर्ट म्हणाले…

मात्र स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज असल्याने राज्य शासनाने केंद्रेकर यांना अडवून न ठेवता त्यांचा अर्ज मंजूर केला. यावर आज न्यायालयाने कोणतीही स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच केंद्रेकर यांच्या कामाचे कौतुक करत ते निवृत्त झाल्यानंतर देखील या प्रकल्पावर सामान्य नागरिकाप्रमाणे लक्ष ठेवू शकतात, सुचना देऊ शकतात, असे मत व्यक्त केले.

दरम्यान, स्वेच्छानिवृत्ती का स्वीकारली याबाबत लेट्सअप मराठीने केंद्रेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली काही खाजगी कारण असल्याचे सांगतं बोलणे पूर्णपणे टाळते. तसेच ते निवडणुकीला उभे राहणार, या चर्चांबाबत विचारले असता, त्यांनी या चर्चांचे खंडन केले. आपला तसा कोणताही विचार नाही. माझी काही खाजगी कारण आहेत, पण निवडणूक आणि राजकारण याबाबत कोणताही विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राची जनता धडा शिकवणार, बीआरएसविरोधात आशिष देशमुखांनी थोपटले दंड…

राज्य शासनाने मंजूर केलेल्या अर्जात काय म्हंटले आहे?

प्रिय श्री. केंद्रेकर,

आपण दिनांक २४.०५.२०२३ आणि दिनांक २६.०५.२०२३ रोजी शासनास सादर केलेल्या स्वेच्छा सेवानिवृत्तीच्या अर्जानुसार आपणांस दिनांक ०३.०७.२०१३ (मध्यान्हपूर्व) रोजी भारतीय प्रशासन सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. आपल्या सेवा कालावधीमध्ये आपण दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल शासन आपले आभारी आहे. तरी, आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार अपर मुख्य सचिव (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क) यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून दिनांक ०३.०७.२०२३ (म.पू) रोजी स्वेच्छा सेवानिवृत्त व्हावे.

सेवानिवृत्तीनंतरचे आपले आयुष्य सुखाचे आणि समाधानाचे जावो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो.

आपला स्नेहांकित,

नितीन गद्रे

श्री. एस. एम. केंद्रेकर, भाप्रसे.

विभागीय आयुक्त, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube