Maya Tata : भारतासह जगातील अनेक बाजारपेठेमध्ये टाटा ग्रुपकडून (Tata Group) व्यवसाय करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय बाजारात टाटाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे टाटाचा येणाऱ्या काळात कोण नेतृत्व करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या काळात 34 वर्षीय माया टाटा (Maya Tata) या साम्राज्याचे नेतृत्व करू शकते. मात्र आता तुम्हाला प्रश्न पडले असेल की, कोण आहे ही माया टाटा?. माहितीनुसार झगमगाटाच्या दुनियेपासून दूर राहून आतापर्यंत मायाने टाटा ग्रुपमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
माया टाटा कोण आहे?
सध्या टाटा ग्रुपच्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माया टाटाकडे दिले आहे. माया ही रतन टाटा यांची भाची आहे तर रतन टाटा (Ratan Tata) यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा (Noel Tata) आणि अलू मिस्त्री (Alu Mistry) यांची कन्या आहे. माया यांची आई आलू मिस्त्री या टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष दिवंगत सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या बहिणी आहेत. सध्या सायरस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट आणि स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट ग्रुपच्या माध्यमातून मिस्त्री कुटुंबाची टाटा सन्समध्ये 18.4% हिस्सेदारी आहे. हीच हिस्सेदारी पाहता भविष्यात माया टाटा ग्रुपचे नेतृत्व करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत
माहितीनुसार, आतापर्यंत मायाने टाटा ग्रुपमध्ये अनेक अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मायाने बेज बिझनेस स्कूल आणि वारविक विद्यापीठमधून आपलं शिक्षण पूर्ण केले आहे. तर टाटा कॅपिटलच्या फ्लॅगशिप प्रायव्हेट इक्विटी फंड, टाटा अपॉर्च्युनिटीज फंडातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. येथे त्यांनी पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि गुंतवणूकदार संबंधांमध्ये आपले कौशल्य आणखी वाढवले आहे.
TATA नवीन ॲप लाँच करण्यात महत्त्वाची भूमिका
तर दुसरीकडे टाटा ग्रुपमध्ये त्यांनी डिजिटलमध्ये देखील मोठी जबाबदारी पार पडली आहे. त्यांची टाटा न्यू ॲप लॉन्च करण्यात महत्वाची भूमिका होती. तर सध्या टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टच्या सहा बोर्ड सदस्यांपैकी माया टाटा एक आहे. 2011 मध्ये रतन टाटा यांनी कोलकातामध्ये असणाऱ्या या कर्करोग रुग्णालयाचा उद्धघाटन केले होते.
‘मी उमेदवारीसाठी हट्ट केलेला नाही, मात्र …’, सुजय विखेंची पुन्हा ‘गुगली’
इकॉनॉमिक टाईम्सच्या आहवालानुसार, टाटा ग्रुपमध्ये माया यांचा प्रभाव वाढत आहे आणि माया आता हळूहळू मोठी जबाबदारी घेण्याची तयारी करत आहे. असं इकॉनॉमिक टाईम्सच्या आहवालात म्हटले आहे. याच बरोबर माया टाटा यांना टाटा ग्रुपसाठी भविष्यातील एक महत्वाचा खेळाडू म्हणून देखील इकॉनॉमिक टाईम्सच्या आहवालात दर्शवण्यात आला आहे.