Download App

Child Birth : बाबो! एकाचवेळी दोन-तीन नाहीतर पाच बाळांना दिला जन्म…

Ranchi : आत्तापर्यंत तुम्ही जुळ्या किंवा तिळ्या बाळांना जन्म दिल्याचं ऐकलंच असेल पण एकाचवेळी आईने चक्क पाच बाळांना जन्म दिला आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे. झारखंडच्या रांचीमधील एका रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. महिलेने एकाचवेळी 5 मुलांना जन्म दिल्याची माहिती ट्विटरवर शेअर करण्यात आली आहे.

Narendra Modi in Australia : सिडनीत PM मोदींचा डंका; सांगितली भारत-ऑस्ट्रेलिया संबंधाची “सी, डी आणि ई

दरम्यान, सध्या आई आणि बाळांची प्रकृती ठीक असून नवजात बाळं सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून या मुलांचं वजन सुमारे 1 किलो ते 750 ग्रॅमपर्यंत आहे. सध्या नवजात बालकांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांची टीम नवजात बालकं आणि आईच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत.

Threat Call: “मी मुंबईत बॉम्बस्फोट करणार…”; पोलिसांना ट्विटरवर पुन्हा धमकी

विशेष म्हणजे एका महिन्यापूर्वीच एका महिलेनं चार मुलांना जन्म दिला होता. त्यावेळीही चार नवजात बालकं आणि आईची प्रकृती चांगली होती. त्यानंतर नवजात बालक आणि आईला डिस्चार्ज देण्यात आला. अशातच आता एकाचवेळी आईने पाच नवजात बालकांंना जन्म देण्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, वैद्यकीय क्षेत्रात पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याने एकच चर्चा सुरु आहे.

Sharad Pawar : “सत्ताधाऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास राष्ट्रवादीची तयारी नाही” : पाटलांच्या ED चौकशीवर पवारांची प्रतिक्रिया

पाच बालकांना जन्म देणाऱ्या महिलेची प्रसूती डॉ. शशिबालसिंग यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. ही महिला इटखोरी, चतरा इथली रहिवासी असून सध्या बालकांना निओनॅटोलॉजी विभागात दाखल करण्यात आलंय.

Music Director Raj : सिनेसृष्टीवर शोककळा, संगीत दिग्दर्शक राज काळाच्या पडद्याआड

ही मुलं प्री-मॅच्युअर असून त्यांचा जन्म 26-27 आठवड्यांत झाला आहे, त्यामुळे त्यांच्या स्थितीवर सतत लक्ष ठेवणं आवश्यक असून, त्या दृष्टीनं मुलांची योग्य काळजी घेतली जात असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आश्चर्यचकित करणाऱ्या बातम्या समाजमाध्यमांवर अनेकदा येत असतात. त्यामध्ये कितपत तथ्य असतं याची पुष्टी केलेली नसते पण रांचीच्या या रिम्स रुग्णालायाकडून एकाचवेळी पाच मुलांना जन्म दिल्याची माहिती ट्विट करुन दिली आहे.

Tags

follow us