Women’s Reservation : विरोधकांसाठी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा राजकारण करण्यासाठीचा अजेंंडाच असून हे निवडणुका जिंकण्याचं हत्यारही असू शकतं, अशी जळजळीत टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी केली आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात(Parliament Special Session) महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान बोलताना अमित शाह(Amit Shah) विरोधकांवर चांगलेच बरसल्याचे दिसून आले आहेत.
पहिले हे बदला! 90 सचिवांमध्ये केवळ 3 OBC; लिस्ट दाखवत राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरलं
अमित शाह म्हणाले, काल संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं, हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नारीशक्तीचा सन्मान केला जात आहे, पण काही पक्षांसाठी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा राजकारण करण्यासाठीच असून निवडणुका जिंकण्यासाठी एक हत्यारही असू शकतं, पण मोदी आणि भाजपासाठी महिला सक्षमीकरण हा राजनैतिक मुद्दा नाही तर मान्यतेचा प्रश्न असल्याचं अमित शाह यांनी स्पष्ट केलं आहे.
धनगर आरक्षणाची मागणी करणाऱ्या उपोषणकर्त्यांचा ‘जलत्याग’; आरक्षणाबाबत सरकार उदासीन असल्याचा आरोप
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा संघटनेचं काम करीत होते, तेव्हा ते गुजरातचे महासचिव होते. मोदींनी वडोदरा कार्यकारणीत भाजपच्या संघटनात्मक पदांमध्ये एक तृतीयांश पदे महिलांसाठी निर्माण केली, अशी पदे निर्माण करणारी भाजप पहिला अन् शेवटचा पक्ष आहे. गुजरातमध्ये महिलांना मोदींनीच आरक्षण दिलं असल्याचं अमित शाह यांनी सांगितलं आहे.
Women’s Reservation Bill लागू झाल्यावर महाराष्ट्रात 16 महिला खासदार तर विधानसभेत किती महिला असणार?
देशात पहिल्यांदा ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ हा नारा पंतप्रधान मोदींनी दिला असून गुजरातमध्ये मोदींमुळेच महिलांना एक तृतीयांश आरक्षण मिळालं आहे, महिला आरक्षण विधेयकाची बाब संविधान संशोधनाचा भाग नाही, मोदींनी महिलांसाठी विविध योजना आणल्या आहेत. महिलांसाठी जनधन योजनेत 70 टक्के खाते उघडली, महिलांना उज्वला गॅस कनेक्शन देऊन सन्मान केला, 3 कोटी महिलांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांचा सन्मानच केला असल्याचं म्हणत अमित शाह यांनी मोदींचं कौतूक केलं आहे.
विरोधकांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न :
महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरु असताना मंत्री अमित शाह बोलत होते. त्याचवेळी विरोधकांकडून वेळ संपल्याच्या घोषणाबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. ‘तुमची दहा मिनिटे संपली’ अशी घोषणाबाजी विरोधी खासदारांकडून करण्यात आली, त्यावर बोलताना शाह म्हणाले, तुम्ही तिथं बसून मला बोलण्यास वेळ देणार का? या शब्दांत शाह यांनी विरोधकांना सुनावलं आहे.