SN Subrahmanyan : प्रसिद्ध उद्योगपती आणि एल अँड टी (L&T) चेअरमन एस एन सुब्रह्मण्यम (SN Subrahmanyan) आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्यात तब्बल 90 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे. कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करावे. रविवारीही काम करावे. सुट्टीच्या दिवशी घरी किती वेळ बायकोकडे पाहणार असं वादग्रस्त विधान त्यांनी केला आहे. एका कार्यक्रमात त्यांना शनिवारी काम करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे विधान केले आहे.
तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी इन्फोसिसचे (Infosys) संस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy) यांनी देशातील तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. मात्र एस एन सुब्रह्मण्यम यांनी आता 90 तास काम करण्याचा सल्ला दिला आहे.
90 तास काम केले तर मला आनंद होईल
या कार्यक्रमात तुमची कंपनी अब्जावधी डॉलर्सची आहे. तरीही तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना शनिवारीही काम करायला लावतात असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, रविवारी मी माझ्या लोकांना कामावर आणू शकत नाही याचे मला वाईट वाटते. माझ्या कर्मचाऱ्यांनी रविवारीही काम केले तर मला आनंद होईल. कारण मी रविवारीही काम करतो. कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करावे. असं एस एन सुब्रह्मण्यम म्हणाले.
बायकोकडे किती वेळ पाहत राहाल?
पुढे एस एन सुब्रह्मण्यम म्हणाले की, कर्मचाऱ्यांनी रविवारी घरी वेळ घालवू नये. रविवारी तुम्ही घरी बसून करणार काय? तुम्ही तुमच्या बायकोकडे किती वेळ पाहत बसणार आणि तुमची बायको तुमच्याकडे किती वेळ पाहणार? त्यामुळे लोकांनी रविवारी देखील काम केले पाहिजे. सध्या एस एन सुब्रह्मण्यम यांची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘डेटा द्या… 8 दिवसात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतो’, जयंत पाटील कार्यकर्त्यांवर भडकले