Download App

तेव्हा मोदींनी फोन केल्यानंतरच माझं मन हलकं झालं; पंतने सांगितला ‘तो’ किस्सा…

अपघातनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्यानंतर माझं मन हलकं झाल्याचं भारतीय संघाचा क्षेत्ररक्षक ऋषभ पंतने पंतप्रधान मोदींसमोरच सांगितलं आहे.

Image Credit: Letsupp

Rishabh Pant : अपघातानंतरचा काळ फार कठीण जात होता, मात्र, त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Pm Narendra Modi) फोन करुन विचारपूस केली, मोदींनी विचारल्याचं कळताच मन हलकं झाल्यासारखं वाटलं असल्याचं भारतीय संघाचा क्षेत्ररक्षक ऋषभ पंतने (Rishabh Pant) सांगितलं आहे. दरम्यान, टी20 विश्वचषकावर (World Cup 2024) नाव कोरल्यानंतर काल भारतीय संघ मुंबईत दाखल झाला आहे. यावेळी क्रिकेटप्रेमींकडून त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर पंतप्रधान मोदींनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. यावेळी खेळाडू आणि मोदींमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या. यावेळी ऋषभने अपघातादरम्यानचा किस्सा सांगितलायं.

Punjab Crime : शिवसेना नेत्यावर जीवघेणा हल्ला, भर रस्त्यात धारदार शस्त्रांनी वार, प्रकृती चिंताजनक

पंत म्हणाला, दीड वर्षांपूर्वी माझा अपघात झाला होता. अपघातानंतरचा कठीण काळ सुरु होता. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आल्याचं आईकडून समजलं होतं. त्यावेळी डोक्यात खूप काही गोष्टी सुरु होत्या, मी पुन्हा खेळू शकणार की नाही, फलंदाजी तर मी करु शकतो पण क्षेत्ररक्षण करु शकतो की नाही, असे अनेक प्रश्न मनात येत होते. मात्र, मोदींचा फोन आल्याचं समजल्यानंतर माझं मन हलकं झाल्याचं पंतने यावेळी बोलताना सांगितलंय. तसेच आम्ही स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खेळलो आणि जिंकलो, आणि संघाला विश्वचषक जिंकून दिला असल्याचंही पंतने भारताच्या विजयावर भाष्य केलंय.

गळ्यात कांद्याची माळ घालत बैलगाडीत लंकेंचं आंदोलन; ‘दिशाभूल’चा ठपका ठेवत विखेंवर टीकास्त्र

पंतच्या आईशी बोलताना त्यांनी मलाच आश्वासने दिली…
ऋषभ पंतचा अपघात झाल्याचं समजल्यानंतर मी डॉक्टरांशी बोललो. पंतला बाहेर कोणत्या डॉक्टरांना दाखवायंच असेल तर जाऊ शकतात, अशा सूचना मी दिल्याचं मोदींनी सांगितलं. त्याचवेळी पंतच्या आईसोबत माझं बोलणं सुरु होतं, त्यांच्याशी माझा काही परिचय नव्हता, मात्र, त्यांच्याशी बोलताना त्यांनीच मला अनेक आश्वासने दिली होती, याचं मला आश्चर्य वाटलं असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलंय.

दरम्यान, अपघातानंतर पंत संघात पुन्हा आला जीवनात असे चढ उतार येत असतात. पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

follow us

वेब स्टोरीज