विश्वचषक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी नाही खेळाडूंनी जिंकला; ‘त्या’ पोस्टरवरून रोहित पवारांनी घेतलं फैलावर

विश्वचषक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी नाही खेळाडूंनी जिंकला; ‘त्या’ पोस्टरवरून रोहित पवारांनी घेतलं फैलावर

Rohit Pawar on Poster of Team India by Maharashtra Government : टी 20 विश्वचषक जिंकलेल्या टीम इंडियाच्या (Team India) मुंबईतील चार खेळाडूंचा (Cricket ) आज विधानभवनात सत्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारडून या खेळाडूंचा विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये गौरव करण्यात येईल. मात्र यासाठी छापण्यात आलेल्या पोस्टरवर टीम इंडियाचा नाही तर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. त्यावरून आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सरकारला (Maharashtra Government) फैलावर घेतले.

Mirzapur 3 : ‘मिर्झापूर 3’ प्राईम व्हिडीओवर विनामूल्य कसे पाहाल? जाणून घ्या…

यावर बोलतना रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जर भारतीय संघाच्या खेळाडूंचं कौतुक केले आहे. मात्र अशा प्रकारचे पोस्टर योग्य नाही. ज्यावर खेळाडूंऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो लावण्यात आले आहेत. भारताला टी-ट्वेंटी विश्वचषक या तिघांनी नाही तर भारतीय खेळाडूंनी जिंकून दिलाय.

विधिमंडळामध्ये खेळाडूंना बोलावलं जात असेल तर या ठिकाणी सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे भारतीय खेळाडूंचं कौतुक करण्यामध्ये राजकारण का आणला जात आहे? या पोस्टरवर केवळ भारतीय संघाचा फोटो असायला हवा होता. असं म्हणत रोहित पवार यांनी सरकारवर या पोस्टरवरून टीका केली आहे.

त्याचबरोबर यावेळी रोहित पवार यांनी नितेश राणेंवर देखईल टीका केली. ते म्हणाले की, तुम्ही खेळामध्ये राजकारण आणत असाल तर तुमची राजकारणाची कुवत आणि उंची अत्यंत छोटी असल्याचे कळतं. भारतीय खेळाडू हे भारताचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे आम्ही राजकीय नेते नंतर आहोत. मात्र त्यांचे चाहते अगोदर आहोत. मात्र नितेश राणे हे समजू शकत नाही. कारण त्यांची राजकीय उंचीच फारच लहान आहे. ते फक्त फडणवीसांना खुश करण्याचं काम करतात. असं पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube