Wrestler returned without shedding medal, Naresh Tikait said- The whole government is engaged to save a Brijabhushan : कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह (Brijabhushan Sharan Singh)यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी त्यांची पदके गंगेत विसर्जित करण्याची घोषणा केली होती. बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. त्यानुसार गंगा नदीत पदकांचे विसर्जन करण्यासाठी हे कुस्तीपटू हरिद्वारला पोहोचले होते. मात्र, भारतीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नरेश टिकैत (Naresh Tikait) यांच्या संमजूतीनंतर पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी मागे घेतला आहे.
https://www.youtube.com/watch?v=BkgtkczyUvE
गेल्या एक महिन्यापासून लैंगिक शोषणाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या भारताच्या पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. जंतरमंतर येथील आंदोलन पोलिसांनी मोडून काढल्यानंतर कुस्तीपटू अधिकच आक्रमक झाले आहेत. आता त्यांनी आरपारची लढायची करायचं ठरवलं. त्यांनी सरकारचा निषेध म्हणून त्यांनी जागतिक स्तरावर जिंकलेली पदके नदीत फेकून देण्याचा निर्णय घेतला. मात्र, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी महिला कुस्तीपटूंशी चर्चा केली.
त्यांची समजूत काढल्यानंतर गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी मागे घेतला आहे.
कुस्तीपटूंसी चर्चा केल्यानंतर टिकैत यांनी केंद्र सरकारला कारवाईसाठी ५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. टिकैत यांना खेळांडूकडून पदकांची बॅगही घेतली आहे. ही बॅग ते राष्ट्रपतींना देणार असल्याचं टिकैत यांनी म्हटलं आहे.
#WATCH | "Entire Indian govt is saving one man (WFI chief Brij Bhushan Sharan Singh). There will be a Khap meeting tomorrow," says Farmer leader Naresh Tikait who intervened and asked protesting wrestlers not to immerse their medals while seeking five days time#WrestlersProtest pic.twitter.com/3xm10VPQg7
— ANI (@ANI) May 30, 2023
दरम्यान, यावेळी माध्यमांशी बोलतांना नरेश टिकैत यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, आता या देशात कुणाला अन्याय विरुध्द आवाज उठवायलाही मुभा आहे की नाही? PM मोदींच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या घोषणेचे काय झाले? राज्यकर्त्यांनी चांगले काम केलं पाहिजं. दोषींना वाचवण्याऐवजी त्यांना करायला पाहीजे. मात्र, आज सरकार आंदोलनकर्त्यां महिलांविरुध्द उभं ठाकलं आहे. केंद्र सरकार एका व्यक्तीला (बृजभूषण शरण सिंह) पाठिशी घालत आहे, असल्याचं टिकैत यांनी सांगितलं.
Crime : उत्तर प्रदेशातून लातूरात आणत 11 वर्षीय तरुणीवर अत्याचार, दोन वर्षांपासून होती बेपत्ता…
महिला कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. ब्रृजभूषण यांनी अनेक कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचे खेळाडूंचे म्हणणे आहे. ब्रृजभूषण यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यावर कारवाई करावी, अशी कुस्तीगीरांची मागणी आहे.