ग्रामपंचायत निवडणूक ! थोरातांच्या गावात विखे गटाची सत्ता

अहमदनगर : राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत असून सकाळी आठ वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतमोजणीला सरुवात झाली आहे. यातच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून धक्कादायक निकाल समोर आले आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विखे गटाने मात दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आजी माजी महसूलमंत्र्यांच्या गटात लढत पाहायला मिळत आहे. यातच थोरातांच्या गटात […]

Vikhe Thorat

Vikhe Thorat

अहमदनगर : राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत असून सकाळी आठ वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतमोजणीला सरुवात झाली आहे. यातच जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून धक्कादायक निकाल समोर आले आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना विखे गटाने मात दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आजी माजी महसूलमंत्र्यांच्या गटात लढत पाहायला मिळत आहे. यातच थोरातांच्या गटात विखे गटाने बाजी मारली आहे. यामुळे थोरात गटाला मोठा धक्का बसला आहे. एकंदरीतच माजी महसूलमंत्र्यांना सध्याचे असलेले महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाने जोरदार धक्का दिला आहे.

दरम्यान जिल्ह्यातील संगमनेर मधील निवडणूक या राज्यात चर्चेच्या ठरत आहे. आजी माजी मंत्र्यांच्या गटामध्ये झालेली ही निवडणूक पाहता संगमेनरच्या तीन गावात विखे पाटील यांच्या गटाच्या पॅनलने मुसंडी मारली आहे.

Exit mobile version