Download App

रिसॉर्टमध्ये दादा भुसे भेटले का? आदित्य ठाकरेंचे थेट फडणवीसांना टोमणा मारणारे उत्तर

  • Written By: Last Updated:

नाशिकः उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे शनिवारी नाशिक दौऱ्यावर होते. आदित्य ठाकरे यांनी दोन रिसॉर्टला भेटी दिल्यात. त्यावेळी त्यांना मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) भेटल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यावर आदित्य ठाकरे यांनी भुसे यांना भेटले नसल्याचे थेट सांगितले. परंतु हे उत्तर देताना छुप्या भेटी आणि हुडी घालून मी कुणाला भेटायला जात नाही, असाही टोमणाही आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

टोमॅटोने पोळलेल्या सरकारचा कांद्यावर आघात! चाळीस टक्के निर्यात शुल्क

आदित्य ठाकरे म्हणाले, ग्रेप काउंटी आणि विवेदा हे रिसॉर्ट बघायला गेलो होते. पर्यटनमंत्री असल्यापासून येथे यायचे होते. परंतु आज संधी मिळाली आहे. येथे पर्यावरण आणि पर्यटन दोन्ही आहे. दादा भुसे यांना भेटले का ? यावर ठाकरे म्हणाले, नाही नाही ओ, ते तेथे होते का ? मला छुप्या भेटीची गरज नाही. हुडी घालून मी कुणाला भेटायला जात नाही. आता कुणाला दरवाजे बंद की उघडे हे उद्धव ठाकरे ठरवतील. ते शिवसेना नसून, गद्दार गँग असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

शिंदेंच्या दोन वाघांना थेट आव्हान! संतोष बांगर, हेमंत पाटलांच्या मतदारसंघात ठाकरेंचा दौरा

आमदाराचा मुलगा उद्योजकाला धमकाविते. काही जण पत्रकाराला मारहाण करतायत. सध्या दादागिरीचे राजकारण सुरू आहे. त्यांना साफ केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला नाही. सध्या देशामध्ये लोकशाही नाही. त्यामुळे राजकीय लोकांवर धाडी पडत आहेत. आता पत्रकारांवर, नागरिकांवर धाडी पडतील, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मंत्रिपद, पालकमंत्र्यांसाठी भांडतायत
कुणी मंत्रिपद मिळविण्यासाठी नाराज आहे. तर कुणी पालकमंत्री मिळत नाही म्हणून नाराज आहे. त्यामुळे दोन्ही पदांसाठी भांडणे सुरू आहेत. परंतु नाशिक-मुंबई, मुंबई-गोवा रस्त्याच्या खड्ड्यासाठी कुणी भांडत नाही. खड्डे पडल्याने रस्त्याला कुठेही वळण दिलेले आहे. मागच्या वर्षापेक्षा यंदा जास्त खड्डे पडले आहेत. याकडे कुणाचेच लक्ष नसल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Tags

follow us