शिंदेंच्या दोन वाघांना थेट आव्हान! संतोष बांगर, हेमंत पाटलांच्या मतदारसंघात ठाकरेंचा दौरा

शिंदेंच्या दोन वाघांना थेट आव्हान! संतोष बांगर, हेमंत पाटलांच्या मतदारसंघात ठाकरेंचा दौरा

Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपला राज्य दौरा मराठवाड्यातून (Marathwada tour) पुन्हा सुरू करणार आहेत. येत्या 27 तारखेपासून हिंगोली (Hingoli) जिल्हा दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. ठाकरे यांनी जुलैच्या पूर्वार्धात विदर्भाचा दौरा केला होता, परंतु राज्यातील मुसळधार पावसामुळे त्यांनी मराठवाडा दौरा पुढे ढकलला होता.

आता निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून ते आपला दौरा पुन्हा सुरू करून मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी इंडियाच्या बैठकीनंतर ठाकरे महाराष्ट्रातील इतर भागांच्या दौऱ्यांची घोषणा करतील.

या दौऱ्यामध्ये हिंगोली शहर येथील रामलीला मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे सभेला संबोधित करणार आहेत. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी शिंदे गटाची वाट धारली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आमदार बांगर यांच्याबद्दल काय बोलणार याची उत्सुकता आहे.

खासदार होण्याची पूर्वी इच्छा होती; शाहू महाराजांच्या विधानानं सस्पेन्स वाढला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 18 पैकी 12 खासदार गेले आहेत. त्यामध्ये हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या दौऱ्यातून लोकसभेच्या उमेदवाराची देखील चाचपणी करणार आहेत.

वरिष्ठांना नाहीत तर जिल्ह्यातील काही लोकांना एजंट म्हणालो, रोहित पवारांचे स्पष्टीकरण

मराठवाड्यात शिवसेना मानणार मोठा मतदारवर्ग आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर ही व्होट बँक आपल्याकडे ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील येवल्यानंतर मराठवाड्यातून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube