Aaditya Thackeray On Bjp leader : जेव्हा भाजप (BJP) अडचणीत येतो. तेव्हा काहीतरी वादग्रस्त प्रकरण काढले जाते. औरंगजेबच्या कबरीचा असो, त्याआधी अबू आझमी होते. आता ते नाही तर मी असतात. बदनामीचा प्रकार सतत पाच वर्षे सुरू राहिलेला आहे. सत्ताधाऱ्यांकडे व्हिजन नसल्याने ते दुसरे विषय घेऊन भरकटत राहत आहेत. दोन-तीन अधिवेशनापासून दिशा सालियन प्रकरणाचे भूत पुढे का आले नाही, याचे मला आश्चर्य वाटत असल्याचे शिवसेनेचे नेते (उबाठा) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी म्हटले आहे.
एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणापासून ते शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकनाथ शिंदे यांचा केलेला सत्कार यावर उत्तर दिले आहे. दिशा सालियन हिच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना फोन केले होते, असा दावा मंत्री नितेश राणेंना केला आहे. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, खरं सांगू का कचऱ्याकडे मी लक्ष देत नाही. महापालिकेला फोन करून सांगतो ही कुठे तरी कचरा पडला आहे. तो उचला. मी लक्ष देत नाहीत. दिशा सालियन प्रकरण कोर्टात असेल तर कोर्टात बोलू, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. निवडणूक आल्यावर, भाजप अडचणीत असेल ते सुरू होते.
…तर मंत्रालयाबाहेर ढोलकी-घुंगरांचा आवाज घुमणार; ‘तो’ व्हिडीओ दाखवत सुरेखा पुणेकरांचा इशारा!
छत्रपती संभाजीनगरमध्ये कबर आहे. हा कबर काढण्याचा विषय सुरू असताना नागपूरमध्येच का दंगल घडली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांवर तुटून पडतोय. पण आता मुख्यमंत्र्यांना कारभार जमत नाही. अडीच वर्षे सीएमओ मी जवळून पाहिले आहे. दंगल घडणार हे माहिती नाही. बांगलादेशमधून ट्वीट झाले होते. औरंगजेबची कबर खोदली पाहिजे, असे भाजप नेते म्हणत आहे. कबर खोदताना पुढे कोण राहणार आहेत. सामान्य कार्यकर्ते राहणार आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांचे मुले राहणार आहेत. भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री आहे. त्यांची अर्धी मुले परदेशात शिकले आहेत. ते परदेशात व्यवसाय करत आहेत. हिंदू आणि मुस्लिम दंगल झाली आहे. याचा कार्यकर्त्यांना त्रास होणार आहे. जे आगी लावतात, त्यांचे कुणाचे काही जात नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
संतोष देशमुख यांची हत्या झाली, तशी दुसरी घटना पुन्हा…पंकजा मुंडे बीड जिल्ह्याबाबत काय म्हणाल्या?
शरद पवारांना आम्ही रोखत नाही पण आम्हाला दु:ख
शरद पवार आणि माझे आजोबा यांच्यात घट्ट मैत्री होती, प्रेमपण होते. राजकीय वाद होते. माझे वडीलही त्यांना वेगळ्या पद्धतीने मानतात. प्रेम आहे, एक नातं आहे. मी पण तसंच मानतो. मी त्यांच्या घरी जातो, ऑफिसला जातो. अनेकदा गप्पा होतात, त्यांचा अनुभव एेकतो. त्यांच्याबद्दल आदर आहे, आदर राहिल, कायम राहील आहे. आघाडी आधी नव्हती, आता आहे. भविष्यात राहिल की नाही माहिती नाही. पण त्यांनी गद्दार व्यक्तीचा. महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती बिघडवलेली आहे, गढूळ केलेली आहे. राजकारण नुसते पैशाचे केले आहे, घाणेरडं केले आहे. त्यांच्याबद्दल कौतुक झालं एका मोठ्या व्यक्तीकडून. त्याचे दु:ख आहे. आम्ही टोकाची भूमिका घेतलेली नाही. आम्ही दु:ख व्यक्त केलेलं आहे. आम्ही दोन वेगळे पक्ष आहेत, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.