Download App

हिम्मत असेल तर भाजपशासित महापालिकांची चौकशी करा, कॅग चौकशीवरुन ठाकरे कडाडले

मुंबईवर त्यांच्या डोळा आहे. त्यांना मुंबईची बदनामी करायची आहे. एवढेच यांचे काम आहे. मुंबईवर यांचा राग असल्याने हे काम सुरु आहे, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी मुंबई महापालिकेची कॅगद्वारे चौकशी होणार असे जाहीर केले होते. त्यावरुन सभागृहात आज अहवाल सादर करण्यात आला. याप्रकरणावर आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. Cm चा अर्थ हा करप्ट मॅन असा झालेला आहे, असे म्हणत त्यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.

बच्चू कडूंची आमदारकी रद्द करण्यासाठी पुण्यात राष्ट्रवादीने लावले बॅनर

आत्ताच्या घटनाबाह्य सरकारमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी निवडणुका लावून दाखवाव्यात. तसेच भाजपशासित महापालिकांची देखील चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आधीच्या सरकारमध्ये आत्ताचे मुख्यमंत्री हेच नगरविकास मंत्री होते. त्यामुळे त्यांची देखील चौकशी करण्यात यावी, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे.

आम्हाला आमचे काम माहित आहे. हा फक्त आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी अन्य महापालिकांची चौकशी करुन दाखवावी, असे ठाकरे म्हणाले आहेत. तसेच त्यांचे ट्रेलर खुप आहेत पिक्चर येईपर्यंत सरकार पडलेलं असेल असा टोला त्यांनी शिंदेंना लगावला आहे.

अपात्र ठरवा, तुरुंगात टाका प्रश्न विचारणारचं; पत्रकार परिषदेत राहुल गांधींचा रूद्रावतार

दरम्यान, राज्यामध्ये दहा महिन्यांपूर्वी भाजप व शिंदे सरकार स्थापन झाल्यावर मुंबई महापालिकेची कॅगच्या द्वारे चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चौकशीची घोषणा केली होती.

Tags

follow us