Download App

‘आप’चा महाविकास आघाडीला पाठिंबा! विधानसभा निवडणूक लढवणार नाही

AAP will not contest Maharashtra Assembly : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येतेय. आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) महाराष्ट्र कार्यकारिणीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. परंतु ‘आप’च्या वरिष्ठांकडून निवडणूक न लढण्याबाबत संकेत मिळत आहेत. आम आदमी पक्ष महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (AAP will not contest Maharashtra Assembly) लढवणार नसल्याची माहिती मिळतेय. महाराष्ट्रासोबतच झारखंडमध्ये देखील आप विधानसभा निवडणूक लढवणार नाही. आम आदमी पक्षाने हा निर्णय का घेतलाय? ‘आप’वर इंडिया आघाडीतील इतर काही घटक पक्षांचा दबाव तर नाही ना? अशी चर्चा सध्या सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांना कोणताही संभ्रम नको, म्हणून आप महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतून माघार घेत आहे, असं समोर आलाय. तर वरिष्ठ इंडिया आघाडीची ताकद वाढण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आपने विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतल्यास महाविकास आघाडीची ताकद वाढेल, भाजपविरोधी मतांची विभागणी न होता याचा फायदा मविआच्या (MVA) आमदारांना होणार असल्याचं चित्र आहे. भाजपविरोधात आपने मोठी खेळी खेळल्याचं दिसतंय.

Aap : काँग्रेसचा बदला घेण्यासाठी ‘इंडिया’शी गद्दारी; स्वाती मालीवालने आपच्या जखमेवर मीठ चोळलं
आम आदमी पक्षाने महाराष्ट्रात २८८ मतदारसंघातील २४ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. परंतु जर यंदा आपने एकही उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरवला नाही, तर याचा फायदा निश्चितपणे महाविकास आघाडीला होणार आहे. आप नेत्यांना वाटतं की, भाजपविरोधी मतांचं विभाजन होऊ शकतं.

AAP Candidate List : मंत्रीच निवडणुकीच्या रिंगणात; ‘पंजाब’साठी आपकडून 8 उमेदवारांची यादी जाहीर

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) आणि राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी ११ ऑक्टोबर रोजी दिल्ली निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्यालयामध्ये बूथ तयारीसाठी एक महत्त्वाची बैठक घेतली होती. आम आदमी पक्ष केवळ दिल्लीमधील विधानसभा निवडणुकीवर फोकस करणार असून मतांची विभागणी टाळण्यासाठी हा निर्णय घेतलेला असल्याची चर्चा सुरू आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आम आदमी पक्षाचा उमेदवार उतरणार नाही. पक्षनेतृत्वाने केवळ दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करण्याचा विचार केलाय. त्याचबरोबर भाजपाविरोधी मतांमधील विभागणी टाळण्यासाठी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक न लढण्याचा देखील पक्षनेतृत्वाचा विचार आहे. इंडिया आघाडी आणि पक्षसंघटना मजबूत करण्यावर आपकडून भर दिला जातोय.

 

follow us