Download App

महाविकास आघाडीला धक्का! सकाळी शरद पवारांसोबत असलेला नेता भाजपच्या वाटेवर

सकाळी शरद पवारांसोबत असलेले अभिजीत पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावर पाटील यांनी ठोस उत्तर दील नाही.

  • Written By: Last Updated:

Abhijeet Patil Way On the BJP : सध्या सगळीकडे लोकसभेच वार वाहतय. या वाऱ्यात कोण कोणत्या बाजूला झुकेल हे सांगता येत नाही. सकाळी विरोधकांच्या सभेत दिसलेला चेहरा सायंकाळच्या सभेत सत्ताधाऱ्यांच्या शेजारी पाहायला मिळणं या काळात फार काही आश्चर्याचं नाही. अशीच एक बातमी समोर आली आहे. आज सकाळी पंढरपुरमध्ये शरद पवारांसोबत (Sharad Pawar) असलेले उद्योजक आणि साखरसम्राट अशी ओळख असलेले (Abhijeet Patil) अभिजीत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

 

विठ्ठल साखर कारखान्यावर जप्ती, अभिजित पाटलांचे शेतकऱ्यांना वचन, स्वत:ला गहाण ठेवू, पण

भाजपच्या वाटेवर

अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई झालेली आहे. त्यामुळे पाटील यांची आर्थिक नाकेबंदी झालेली आहे अशी सध्याची परिस्थिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाटील यांचे यामधून बाहेर पडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, त्यामध्ये त्यांना यश आलेलं नाही. अखेर ते भाजपमध्ये जाणार असल्याची सुत्रांची खात्रीशीर माहिती समोर आली आहे.

 

कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार

याबाबत सध्या फक्त चर्चा असली तरी पाटील यांनी ही चर्चा खोडून काढलेली नाही. विठ्ठल सहकारी कारखाना वाचवण्यासाठी आपण घ्याल तो निर्णय मान्य असेल अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यावर पाटील हे निर्णय जाहीर करतील असंही बोललं जातय. दरम्यान, याबबात पाटील यांना विचारलं असता पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू असून त्यावर कोणताही निर्णय झाला नाही.

 

विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना साखर व इथेनॉल परिषदेत मानाचा पुरस्कार

काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष

करमाळा येथे शरद पवार यांच्यासोबत अभिजीत पाटील सभेत उपस्थित होते. त्या दरम्यान, विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर राज्य सहकारी शिखर बँकेने जप्तीची कारवाई केली आहे. त्यामध्ये कारखान्यातील तीन गोदामही सील केली आहेत ज्यामध्ये तब्बल एक लाख साखर पोती आहेत. अशा परिस्थितीमध्ये पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

follow us