विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना साखर व इथेनॉल परिषदेत मानाचा पुरस्कार

  • Written By: Published:
विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना साखर व इथेनॉल परिषदेत मानाचा पुरस्कार

नवी दिल्ली: देशाच्या साखर आणि इथेनॉल उद्योगातील अग्रगण्य संस्था असलेल्या ‘चिनीमंडी’ संस्थेकडून प्रतिष्ठेचा शुगर अँड इथेनॉल इंटरनॅशनल पुरस्कार देण्यात आले. या सोहळ्यात पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे (Shri Vitthal Sahakari Sakhar Karkhana Pandharpur) अध्यक्ष अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. त्यांना सर्वाधिक जलद साखर कारखाना अधिग्रहण या श्रेणीत पुरस्कार मिळाला आहे.


बिबट्याची डरकाळी जुन्नरमध्येच! बेनके, सोनवणेंच्या लढ्याला यश, बिबट सफारी प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी

हा पुरस्कार खरेतर माझ्या सर्व संचालक, शेतकरी, कामगार आणि सभासद बांधवांचा आहे.. मी केवळ माध्यम आहे, अशी प्रतिक्रिया अभिजीत पाटील यांनी दिली. नवी दिल्ली येथील येथे झालेल्या साखर आणि इॅथेनॉल परिषद 2024 मध्ये अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
यावेळी ‘चिनीमंडी’चे संस्थापक व सीईओ उप्पल शहा, हेमंत शहा, जे.के.ग्रुपचे संस्थापक जितुभाई शहा, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्ट्रीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाइकनवरे, आईएसएससीटी परिषदेचे अध्यक्ष व द शुगर टेक्नोलॉजिस्ट एसोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय अवस्थी, श्री रेणुका शुगर्स लिमिटेडचे अतुल चतुर्वेदी, निरानी ग्रुपचे मुरुगेश निरानी, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राजनाथ सिंह अन् अमित शाहंसाठी मोदींची तुफान बॅटिंग; काँग्रेसला घेतलं फैलावर

साखर, इथेनॉल आणि संबंधित उद्योगांमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेणे आणि त्यांचे कौतुक करणे हे SEIA ॲवॉर्डसचे उद्दिष्ट होते. देशातील काही संस्था आणि व्यक्तींनी साखर आणि इथेनॉल उद्योगांवर त्यांच्या मेहनतीची, योगदानाची दखल घेत त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचे चिनीमंडीचे संस्थापक व सीईओ उप्पल शाह यांनी सांगितले.

एकच प्रोडक्ट पुन्हा पुन्हा लाँच केल्याने काँग्रेसच्या दुकानाला टाळे ठोकण्याची वेळा, नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

ऊस उत्पादक (शेतकरी), खाजगी कारखाने, सहकारी कारखाने, इथेनॉल उत्पादक, स्टँडअलोन डिस्टिलरीज, खांडसरी कारखाने, देशांतर्गत व्यापारी, आंतरराष्ट्रीय व्यापार घराणे, साखर किरकोळ विक्री श्रृंखला, लॉजिस्टिक कंपन्या, रेक ट्रान्सपोर्ट, सी&एफ एजंट, बँका, एनबीएफसी, ब्रँडेड साखर, घाऊक ग्राहक, बंदरे, साखर कारखाने पुरवठादार, अभियांत्रिकी कंपन्या, आंतरराष्ट्रीय व्यापारी (व्यक्ती), सामाजिक कार्यकर्ते, कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यक्ती, संपार्श्विक व्यवस्थापन, विमा कंपन्या, लाइफटाइम अचीवमेंट अवार्ड, संशोधन गृहे आणि संस्था यांचा समावेश होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube