माढा, सोलापुरात राजकीय गुगली! मविआला धक्का, बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा

माढा, सोलापुरात राजकीय गुगली! मविआला धक्का, बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा

Madha Lok Sabha Election 2024 : माढा लोकसभा मतदारसंघ राज्यात चर्चेत आहे तो येथील (Madha Lok Sabha Election) सातत्याने बदलत्या डावपेचांनी. आता महाविकास आघाडीला धक्का देणारी घटना या मतदारसंघात घडली आहे. राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटील यांनी (Abhijeet Patil) अखेर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांना मोठा दिलासा दिला आहे. तर ऐन निवडणुकीच्या आधी घडलेली ही राजकीय गुगली महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ करणारी ठरणार आहे. दरम्यान, अभिजीत पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद आणि विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत माढा आणि सोलापूर लोकसभेसाठी (Solapur Lok Sabha Election) भाजपला पाठिंबा जाहीर केला.

Madha Lok Sabha : धैर्यशील मोहितेंना माढा अवघडच, कारणेही अनेक; निंबाळकरांची बाजू तगडी

याआधी चार दिवसांपूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शिखर बँकेने 442 कोटी रुपयांच्या कर्जासाठी जप्तीची कारवाई केली होती. यानंतर अभिजीत पाटील यांनी भाजपला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिल्याची चर्चा सोलापूरच्या राजकारणात सध्या सुरू आहे. याआधी कारखान्यावर ज्यांची सत्ता होती. त्यांच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून कारखान्यावर शिखर बँकेची कारवाई सुरू असल्याचे पाटील यांनी या मेळाव्यात सांगितले.

यानंतर फडणवीसांनी तत्काळ निर्णय घेत कारखान्याला जीवनदान दिले. त्यामुळे आता आम्ही माढा मतदारसंघात रणजित निंबाळकर यांना तर सोलापूर मतदारसंघात राम सातपुते यांना पाठिंबा दिल्याचे पाटील यांनी यावेळी जाहीर केली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर खेळली गेलेली ही खेळी महाविकास आघाडीला मात्र अडचणीत टाकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Lok Sabha Election: माढा, सातारा, सोलापूरमध्ये पंतप्रधानांच्या सभांचा धडाका ! पुण्यात मुक्काम

अभिजीत पाटील यांनी पाठिंबा जाहीर केल्याने दोन्ही मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांचे बळ वाढणार आहे. माझी महत्वाकांक्षा बाजूला ठेऊन कारखाना टिकला पाहिजे. सोलापुरात ऊस दरासाठीची स्पर्धा अशीच पुढे सुरू राहिली पाहिजे. याद्वारे शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळाला पाहिजे यासाठी आपण ही राजकीय भूमिका घेतली असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube