Download App

पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला, सुपारीबाज…; आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

पाच वर्षांनंतर पक्ष झोपेतून उठला आहे. ते निवडणुकीच्या काळात जागे होतात, अशी खोचक टीका आदित्य ठाकरेंनी मनसेवर केलाी.

  • Written By: Last Updated:

Aditya Thackeray on Raj Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तारखा अद्याप जाहीर झाल्या नाहीत. मात्र, सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही (Raj Thackeray) ॲक्शन मोडमध्ये आलेत. त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात सोलापूरपासून झाली असून सोलापूर दौऱ्यातून त्यांनी विधानसभेचे दोन उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळं मनसेनं आगामी निवडणुकीसासाठी रणशिंग फुकल्याचं दिसतं. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray)राज यांच्या दौऱ्यावरून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

आरोपीला सोडण्यासाठी जयंत पाटलांच्या बंगल्यावरून फोन; सचिन वाझेंचा खळबळजनक दावा 

पाच वर्षांनंतर पक्ष झोपेतून उठला आहे. ते निवडणुकीच्या काळात जागे होतात, अशी खोचक टीका आदित्य ठाकरेंनी मनसेवर केलाी.

आज आदित्य ठाकरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना राज ठाकरेंबद्दल विचारले असता ते म्हणाले, पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठलेला आहे. ते निवडणुकीच्या वेळी जागे होतात. मग महाराष्ट्र पिंजून काढणार, असं त्यांचे दौरे चालतात. सुपारीबाज पक्ष आहे ते त्यांचं काम करतील. आम्ही आमचं जनतेच्या सेवेचं काम करत आहोत. गेल्या पाच वर्षांत मग त्यामध्ये कोविडच्या काळात किंवा मुंबईत इतर काही घटना घडत असतांना हा पक्ष दिसला तरी का? असा सवाल करत आम्ही त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नाही. सुपारीबाज पक्ष आहे, तो तिथेच राहिल, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला.

कोण आहेत लष्करप्रमुख जनरल वकार? शेख हसीना यांच्यानंतर स्वीकारणार बांगलादेशची जबाबदारी… 

विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी खोचक टोला लगावला. मला वाटलं वरळीत माझ्या विरोधात बायडन लढत आहेत, असा टोला आदित्य यांनी लगावला.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी बांगलादेशच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. तो त्यांचा स्थानिक विषय जरी असला तरी आपल्या देशावर याचा परिणाम होऊ शकतो, याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं आदित्य म्हणाले.

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला आता मनसेकडून काय प्रत्युत्तर मिळतं, हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us