आरोपीला सोडण्यासाठी जयंत पाटलांच्या बंगल्यावरून फोन; सचिन वाझेंचा खळबळजनक दावा
Sachin Waze on Jayant Patil : महाराष्ट्रातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांचे चक्र वेगाने फिरत आहेत. तुरुंगात असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी (Sachin Waze) माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यानंतर आता शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर गंभीर आरोप केला. सर्वांत मोठ्या आरोपीला सोडण्यासाठी जयंत पाटलांच्या शासकीय बंगल्यावरून फोन आला होता, असा दावा वाझेंनी केला. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले.
Lakshya Sen : भारताला धक्का, लक्ष्य सेनचा पराभव, कांस्यपदक हुकले
अलीकडेच वाझेंनी फडणवीसांना एक पत्र लिहिल होतं. त्या पत्रात पत्रात वाझेंनी अनिल अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख पीएमार्फत पैसे घ्यायचे, असा दावा वाझेंनी फडणवीस यांना पत्र लिहित केला होता. एवढचं नाही तर आता जयंत पाटील यांच्या नावाचाही पत्रात उल्लेख असल्याची माहिती समोर आली.
अनिल देशमुख गृहमंत्री असताना जयंत पाटील यांनी अवैध काम करून घेतले, एवढचं नाही तर चांदीवाल समितीत मी जबाब देत असतांना माझ्यावर देशमुख दबाव आणत होते, असा आरोप वाझेंनी केला होता.
कोण आहेत लष्करप्रमुख जनरल वकार? शेख हसीना यांच्यानंतर स्वीकारणार बांगलादेशची जबाबदारी…
वाझेंनी जयंत पाटील यांच्याविषयी या पत्रात आरोप केला की, आपण मुंबई पोलीस दलाच्या गुप्तचर शाखेचे प्रमुखपदी असतांना अवैध हुक्का पार्लर आणि भारतातील सर्वात मोठ्या वितरकाला अटक केली होती. अटकेनंतर जयंत पाटील यांच्या शासकीय बंगल्यावरून आरोपींना सोडण्याबाबत आणि त्या बदल्यात दुसऱ्याा अटक करण्याबाबत फोन आल्याचा दावा वाझेंनी केला. या आरोपाची ऑडिओ रेकॉर्डिंग असल्याचा दावाही वाझेंनी केला.
वाझेंनी आता जयंत पाटील यांचंही नाव घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वाझेंच्या या आरोपामुळं या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाझेंनी केलेल्या आरोपाला जयंत पाटील काय प्रत्युत्तर देतात हेच पाहणं महत्वाचं आहे.