ह्रदयात राम अन् हाताला काम, हे हिंदुत्व; आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर केलं पण…; ठाकरे गटाची BJP टीका

Aditya Thackeray : उद्या अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील व्हीआयपी आणि पक्ष प्रमुखांना निमंत्रित करण्यात आलं. मात्र, विरोधी पक्षांनी हा सोहळा भाजपच्या राजकीय प्रचाराचा भाग असल्याची टीका केली. राम मंदिर मुद्यावरून भाजप आणि ठाकरे गट यांच्याच शाब्दिक […]

Aditya Thackeray

Aditya Thackeray

Aditya Thackeray : उद्या अयोध्येतील राम मंदिरा (Ram Mandir) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील व्हीआयपी आणि पक्ष प्रमुखांना निमंत्रित करण्यात आलं. मात्र, विरोधी पक्षांनी हा सोहळा भाजपच्या राजकीय प्रचाराचा भाग असल्याची टीका केली. राम मंदिर मुद्यावरून भाजप आणि ठाकरे गट यांच्याच शाब्दिक चकमकी सुरू आहेत. आताही आदित्य ठाकरेंनी भाजपवर टीका केली. ह्रदयात राम आणि हाताला काम, हे आमचे हिंदुत्व आहे, असं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले.

चार वेळा मुख्यमंत्रिपद पण दुर्दैवाने मोठे काम नाही, अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

आज पिंपरीतील महान्याय सभेत बोलतांना आदित्य ठाकरेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी सभेला संबोधित करतांना ते म्हणाले, ह्रदयात राम आणि हाताला काम, हे आमचे हिंदुत्व आहे. आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं, पण कुठेही दंगली घडू दिल्या नाहीत, असं वक्तव्य करत भाजपवर निशाणा साधला.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नांदेडमध्ये झळकले अशोक चव्हाणांचे बॅनर, नेमकं चव्हाणांच्या मनात तरी काय? 

पुढं बोलतांना ते म्हणाले, वेदांत फॉक्सकॉनसह 160 कंपन्या महाराष्ट्रात येणार होत्या. मात्र, त्याआधीच कंपन्या परराज्यात पळवल्या. त्यामुळं महाराष्ट्रातील लाखो तरुणांचा रोजगार गेला आणि राज्यातील तरुण बेरोजगार झाला. असं झालं नसतं, पण, काहींनी गद्दारी केली. ही गद्दारी म्हणजे देशाची बेईमानी आहे, अशी टीका त्यांनी शिंदे गटावर केली. पुढे बोलतांना ते म्हणाले, वेदांत फॉक्सकॉन कंपनी आता गुजरातमध्येही होणार नाही. त्यांनी करार रद्द केला आहे. कारण तिथे कंपनी स्थापन करायला सात वर्षे लागणार होती. गुजरातचे भले करण्याच्या नादात भाजपनं देशाचे नुकसान केलं, असंही ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले, देशात फक्त महाराष्ट्रावर अन्याय होत आहे. यासाठी नवीन कलम आणलेत. पण महाराष्ट्रावर किती काळ अन्याय होत राहणार? आता हे घटनाबाह्य सरकार आपलं मंत्रालय ही गुजरातला पळवतील, अशी टीका त्यांनी केलं.

Exit mobile version