Download App

ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करावं, नगरमध्ये झळकलं बॅनर

"ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करावं" अशा आशयाचा बॅनर नगरमध्ये झळकवलं आहे. महापुरूषांचे फोटो असलेल्या या बॅनरवर चेहरा नसलेला एक व्यक्ती झळकत आहे.

  • Written By: Last Updated:

Ahmednagar Lok Sabha : सध्या लोकसभा निडवणुकीची रणधुमाळी सुरु असून, राजकीय पक्षांचा प्रचार चांगलाच रंगात आला आहे. यातच सध्या नगरमध्ये बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे. (Ahmednagar City) “ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करावं” अशा आशयाचा बॅनर नगरमध्ये झळकवलं आहे. महापुरूषांचे फोटो असलेल्या या बॅनरवर एक मफलर घातलेला मात्र चेहरा नसलेला एक व्यक्ती झळकत आहे. (OBC ) पण त्या आकृतीच्या गळ्यातील मफलर पाहता बॅनर लावणारी मंडळी मंत्री छगन भुजबळ यांचं नाव सुचवू पाहत असल्याची चर्चा आहे. (Loksabha Election) लोकसभेच्या पार्शवभूमीवर हे पोस्टर नगरमध्ये झळकल्याने याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

कर्नाटकमध्ये एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, हा फार्म्युला काँग्रेस देशभर राबविणार; मोदींचा खळबळजनक दावा

ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करा

लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. महायुतीकडून सुजय विखे हे मैदानात उतरले आहेत तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून निलेश लंके आहेत. तसंच, या लोकसभेच्या रिंगणात ओबीसी महासंघाच्या दिलीप खेडकर यांनी देखील एन्ट्री घेतली आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर नगर शहरामध्ये ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करा अशा आशयाचं बॅनर लागलं आहे. या बॅनरवर मफलर घातलेल्या व्यक्तीची आकृती दिसत आहे. व्यक्तीचा फोटो छापण्यात आलेला आहे.

 

नेमकं काय आहे बॅनरवर

नगर शहरातील प्रमुख चौकामध्ये लावण्यात आलेल्या या पिवळ्या रंगाच्या बॅनर्सवरील भागावर महापुरूषांचे फोटो दिसून येत आहे. त्याखालोखाल ओबीसींनी ओबीसीलाच सहकार्य करा, असा मजकूर छापण्यात आला आहे. मात्र, या पोस्टरवर सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे बॅनरवर मफलर परिधान केलेल्या माणसाचं चित्र आहे. संबंधित आकृतीच्या गळ्यातील मफलर पाहता बॅनर लावणारी मंडळी मंत्री छगन भुजबळ यांचं नाव सुचवू पाहत असल्याची चर्चा आहे. सध्या हे बॅनर्स चर्चेचा विषय ठरत आहे.

 

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा अहमदनगरमध्ये हल्लाबोल! विरोधकांच इंजिन बंद म्हणत रावणरुपी लंकेचं दहन करण्याची टीका

बॅनर्समुळे नेत्यांचे टेन्शन वाढले

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा लढा निर्माण झाला होता. मनोज जरांगे यांनी मराठ्यांसाठी लढा पुकारला तर ओबीसींच्या आरक्षणाच्या बचावासाठी मंत्री छगन भुजबळ हे मैदानात उतरले. यामुळं ओबीसी समाजाचा एक प्रमुख चेहरा म्हणून भुजबळ यांच्याकडे पाहिलं जाते. यातच नगर दक्षिण लोकसभेत दोन्ही उमेदवार हे मराठा समाजाचे आहे. यामुळे आता या लढतीत ओबीसीने देखील उडी मारली आहे. यातच निवडणुकीपूर्वीच हे बॅनर झळकल्याने आता नेत्यांचं तसेच उमेदवारांचे टेन्शन वाढलं आहे.

follow us