Download App

…तर माझा उदो उदो केला असता; ‘चादर लगी फटने, खैरात लगी बटने’ वर अजितदादांचे जोरदार प्रत्युत्तर

जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्याला माध्यमांशी बोलताना Ajit Pawar यांनी उत्तर दिले आहे.

Ajit Pawar Answered to Jayant Patil on Budget : हाच अर्थसंकल्प मी जर त्यांच्या बाजूने मांडला असता तर माझा उदो उदो केला असता. असं म्हणत अजित पवारांनी (Ajit Pawar) जयंत पाटील (Jayant Patil) आणि उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले. राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी आज विधिमंडळात अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्याला माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.

अर्थसंकल्प नव्हे तर फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

अजित पवार म्हणाले की, अर्थसंकल्पावर विरोधकांना काही बोलता येत नसल्याने ते अशा प्रकारे टीका करत आहेत. हाच अर्थसंकल्प मी जर त्यांच्या बाजूने मांडला असता तर माझा उदो उदो केला असता. त्यांच्याकडे असतानाही मी अर्थसंकल्प मांडला त्यावेळेस त्यांनी काय वक्तव्य केले होते ते सर्वांनीच पाहिले. शेवटी सत्ताधारी हे अर्थसंकल्पाचे कौतुक करत असतात तर विरोधक कधीच अर्थसंकल्पाचा कौतुक करणार नाही कारण त्यांना जे साध्य करायचे ते साध्य होणार नाही.

अजित पवारांकडून मोठी घोषणा, मुंबईसह ‘या’ शहरात पेट्रोल – डिझेलचे दर कमी होणार

काय म्हणाले होते जयंत पाटील?

‘चादर लगी फटने, खैरात लगी बटने’ असा शब्दात राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी या अर्थसंकल्पावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आज अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर जयंत पाटील यांनी विधानसभा परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, महायुतीला लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) फटका एवढा मोठा आहे की मराठीत एक म्हण आहे ‘चादर लगी फटने, खैरात लगी बटने’ सध्या महायुतीची चादर फाटली असून त्यांच्याकडून खैरात वाटली जात आहे. या सरकारला खात्री झाली आहे.

अर्थसंकल्प म्हणजे लबाडाघरचं आवतन…

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी बोलतांना ते म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या आश्वासने आणि थापांना कंटाळून चिडलेल्या महाराष्ट्राने जो काही दणका त्यांना दिला, त्याने सत्ताधाऱ्यांचे डोळे थोडेस किलकिले झालेले दिसत आहे. तही देखील जनता त्यांच्या थांपावर विश्वास ठेवेल, असं मला वाटत नाही, महाराष्ट्रातील जनता ही सुजाण, सज्ञान आणि स्वाभिमानी आहे. त्यांनी कितीही फसवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र ओरबडून गुजरातला नेण्याचं षडयंज्ञ उघड झालंय, महाराष्ट्र गुजरातच्या पाठी गेला आहे, असं ठाकरे म्हणाले.

follow us