Download App

‘अजित पवार चॅलेंज देतो तेव्हा जिंकूनच दाखवतो’; शड्डू ठोकल्यानंतर दादांचं आव्हान

Ajit Pawar News : अजित पवार चॅलेंज देतो तेव्हा जिंकूनच दाखवतो, या शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाविकास आघाडीला खुलं आव्हानच दिलं आहे. शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) 27 ते 30 डिसेंबर यादरम्यान किल्ले शिवनेरी ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार आहेत. अमोल कोल्हेंच्या भूमिकेवरुन अजित पवारांनी आता थेट आव्हान दिलं असल्याचं दिसून येत आहे.

Aishwarya Sharma: एक्स बॉयफ्रेंडवर भडकली ऐश्वर्या शर्मा.. म्हणाली ‘लाज वाटली पाहिजे तुला..’

अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीकडे उमेदवार नाहीत म्हणून ते असं करत आहेत. महाविकास आघाडीला राज्यातील विविध भागांतील उमेदवार घेत आहेत. शिरुर मतदारसंघ महायुतीचा उमेदवार मी निवडूनच आणणार आहे. अजित पवार चॅलेंज देतो तेव्हा जिंकूनच दाखवतो, असं खुलं आव्हान अजित पवार यांनी शरद पवार गटाला दिलं आहे. शिरुर मतदारसंघात सध्या शरद पवार गटाचे अमोल कोल्हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे आता अमोल कोल्हेंच्या विरोधात अजितदादा रणनीती आखून विजय खेचून आणणार असल्याचं बोललं जात आहे.

काळजीच करु नका, शिरुरमध्ये पर्याय देणार अन् निवडूनही आणणार : अजितदादांचा कोल्हेंविरोधात शड्डू

राजकारणात कोणालाही भेटी घेण्याचा अधिकार आहे. राजकारणात कोणीही कोणाच्या भेटी घेऊ शकतं. मी पुण्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, भोसरी, हडपसर आणि शिरुरमध्ये जाणार आहे. खासदार अमोल कोल्हे यांना मी पक्षात घेतलं आहे. निवडून आल्यानंतर त्यांच्या मनात काय आलं माहित नाही. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी राजीनामा देण्याबाबतचं सांगितलं होतं. त्यांना राजीनामा देण्यापासून मीच थांबवलं होतं. आता त्यांचं मनच त्यांना खात आहे. त्यामुळेच ते आता संघर्षयात्रा, पदयात्रा काढत असल्याची टीकाही अजितदादांनी केली आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघटना बनवणार कुस्ती महासंघ चालविण्यासाठी खास पॅनेल; क्रीडा मंत्रायलयाची माहिती

दरम्यान, पाच वर्ष त्यांच्या मतदार संघात लक्ष दिले असते. पण आता निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे यांना उत्साह आला आहे. त्यातून कोणाला संघर्ष यात्रा सुचत आहे तर कोणाला पदयात्रा सुचत असल्याची टीका अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंच्या शेतकरी आक्रोश मोर्चावर केलीयं. तुम्ही काळजीच करु नका, शिरुरमध्ये पर्याय देणार आणि निवडूनही आणणार असल्याचा निर्धारही अजित पवार यांनी बोलून दाखविला आहे.

Tags

follow us