भारतीय ऑलिम्पिक संघटना बनवणार कुस्ती महासंघ चालविण्यासाठी खास पॅनेल; क्रीडा मंत्रायलयाची माहिती

  • Written By: Published:
भारतीय ऑलिम्पिक  संघटना बनवणार कुस्ती महासंघ चालविण्यासाठी खास पॅनेल; क्रीडा मंत्रायलयाची माहिती

panel for wrestling federation : दोन दिवसांपूर्वी क्रीडा मंत्रायलयाने संजय सिंह (Sanjay Singh) यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या (Wrestling Federation of India) अध्यक्षपदी निवड केली होती. त्यानंतर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कुस्तीगीर संघटनेची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. मात्र, केंद्र सरकारने ही कार्यकारिणी आज बरखास्त केली आहे. याशिवाय संजय सिंह यांनाही निलंबित केलं. दरम्यन, आता क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (IOA) भारतीय कुस्ती महासंघ (WFI) चालविण्यासाठी तात्पुरते पॅनेल तयार करण्यास सांगितले आहे.

Brijbhushan Sharan Singh यांनी साक्षीचे आरोप फेटाळले; संजय सिंह निकटवर्तीय नसल्याचा दावा 

नव्याने स्थापन झालेल्या भारतीय कुस्ती महासंघाला निलंबित केल्यानंतर काही तासांनंतर, केंद्र सरकारने भारतीय ऑलिम्पिक संघटनेला कुस्ती संघ चालविण्यासाठी एक पॅनेल तयार करण्यास सांगितले आहे. ही ऑलिम्पिक असोसिएशन खेळाडू निवड प्रक्रियेसह भारतीय कुस्ती महासंघ (WFI) च्या कामकाजावर देखरेख ठेवणार आहे, अशी माहिती आहेत.

याबाबत केंद्राने म्हटले आहे की, WFI च्या माजी पदाधिकाऱ्यांच्या प्रभाव आणि नियंत्रणामुळे उद्भवलेली सद्यस्थिती पाहता, WFI च्या प्रशासन आणि अखंडतेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळं कुस्तीगीर संघटनेची कार्यकारणी रद्द करण्यात आली आहे. कुस्तीगीर संघटनांमध्ये तत्काळ आणि कठोर सुधारात्मक उपायांची गरज आहे.

‘एक कुठंतरी रहा… मला तसं चालणार नाही’; अजितदादांची कार्यकर्त्यांना तंबी 

कुस्ती महासंघाच्या निवडणुक जिंकून संजय सिंह हे भारतीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष बनले. सिंह हे ब्रृजभूषण शरण सिंग यांच्या जवळचे आहेत. बृजभूषण यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यांच्याविरोधात दिल्लीत 40 दिवस सर्व कुस्तीपटूंनी निदर्शनेही केली होती. मात्र, आता कुस्ती संघटनेच्या निवडणुकीत बृजभूषण यांच्या निकवर्तीयाने बाजी मारली. यामुळे साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला. तर बजरंग पुनिया यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पद्मश्री परत करण्याचा निर्णय घेतला. कुस्तीपटूंचा वाढता रोष पाहून क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांची कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. तसेच, त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीलाही निलंबित करण्यात आले आहे.

त्यानंतर आता क्रीडा मंत्रालयाने ऑलिम्पिक संघटनेलाभारतीय कुस्ती महासंघ चालविण्यासाठी तात्पुरते पॅनेल तयार करण्यास सांगितले आहे.

दरम्यान, संजय सिंह यांच्या निलंबनावर बोलताना साक्षी मलिकने सांगितले की, सरकारने घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करते. आमचा लढा या सरकारविरुद्ध कधीच नव्हता. आमची लढाई फक्त एका माणसाशी होती. आम्हाला आमच्या खेळाडूंच्या भवितव्याची चिंता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube