‘एक कुठंतरी रहा… मला तसं चालणार नाही’; अजितदादांची कार्यकर्त्यांना तंबी

  • Written By: Published:
‘एक कुठंतरी रहा… मला तसं चालणार नाही’; अजितदादांची कार्यकर्त्यांना तंबी

Ajit Pawar Baramati Speech : अजित पवारांनी (Ajit Pawar) बंड केल्यामुळं राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) दोन गट पडले. सध्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांना कायम कोंडीत पकडलं जातं. दरम्यान, आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना चांगलंच ठणकावलं. एकतर माझ्यासोबत राहा, किंवा तिकडं जा. इकडंपण राहायचं आणि तिकडंपण राहायचं, हे आता चालणार नाही, असं कडक शब्दात बजावलं.

Maratha Reservation : सरकारच्या मनात काय? नानांनी गंभीर आरोप करीत सांगितलं 

आज बारामतीच अजित पवारांच्या हस्ते नवीन सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार झाला. त्यावेळी अजित पवार बोलत होते. ते म्हणाले की, आपण सरकारमध्ये गेलो, त्यामुळं अनेक प्रश्न सुटले. मी जेवढं काम करतो, तेवढं दुसर कुणी करू शकत नाही.
मी आमदार, विरोधीपक्ष नेता म्हणून काम केलं. मात्र, सर्वांगिक विकास तेव्हा करू शकतो, जेव्हा आपण सत्तेत असतो. सत्तेत नसू तर आपल्याा विकासाची कामे करता येत नाही. आज आपण सत्तेत आहोत, जोपर्यंत तुम्ही माझ्या पाठीशी आहोत, तोपर्यंत मी कामाला कमी पडणार नाही. आणि कोणत्याही घटकाला वाऱ्यावर सोडणार नाही, असं ते म्हणाले.

…तर 500 खासदारांचा कार्यक्रमच आटोपला असता’; संसद घुसखोरीवरुन सुळेंचा हल्लाबोल 

आपल्या शब्दाला वजन
पुढं बोलतांना अजित पवार म्हणाले, बारामतीकरांच्या भरभक्कम पाठिंब्यामुळं मी अर्थमंत्री, नियोजनमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे. आता आपल्या शब्दाला वजन आलं. आज माझे अमति शाह, नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. याआधी मी सतत मागं असायचो. पण, आता आता मोठ्या लोकांशी संबंध येत आहेत. काम होत आहेत. आज मी सत्तेत नसतो तर मला विकासाची काम करायला जमली असती का? मी पालकमंत्री नसतांना बारामतीचा काय विकास होता, कशी काम व्हायची? आणि आता कशी पटापट काम होत आहेत, हे तुम्ही बघत आहात… बारामतीच्या सर्वांगिण विकासाठी आपण सत्तेत असल्यानं काम करता येत आहेत, असं अजित पवार म्हणाले.

ते म्हणाले, आज तुम्ही सर्वजण माझ्यावरबरोबर आहात. मात्र, आता तुम्हाला थोडी कठोर भूमिका तुम्हाला घ्यावी लागले. इकडंपण राहायचं आणि तिकडपण राहायचं हे चालणार नाही. ज्यांना माझ्या बरोबर राहायचं त्यांनी माझ्याबरोबर राहा. ज्यांना इतर ठिकाणी जायचं, त्यांनी खुशाला जावं. पण मी सत्तेत असल्यामुळं बारामतीचा विकास करू शकतो, मी कोणत्याही कामात कमी पडणार नाही, अशी ग्वाही अजित पवारांनी दिली.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube