Download App

तुम्ही तरबेज आहातच; CM शिंदेंसमोरच अजितदादांचे गिरीश महाजनांना शालजोडीतून टोमणे

गिरीष महाजन तुम्ही तरबेज आहातच, पण राज्यात आता तीन पक्षाचं सरकार त्यामुळे आता राष्ट्रवादीचेही झेंडे लावत चला, असे शालजोडीतून टोमणेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मारले आहेत. दरम्यान, धुळ्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अजित पवार जनतेला संबोधित करीत होते. राज्यात आता तीन पक्षांचं सरकार अस्तित्वात असून त्यामध्ये राष्ट्रवादीचाही झेंडा लावा, अशी विनंतीच अजित पवार यांनी केली आहे.

बारामती लोकसभेसाठी महादेव जानकरांनी पुन्हा थोपटले दंड; सुप्रिया सुळेंना देणार टक्कर

यावेळी बोलताना ते म्हणाले, आजच्या कार्यक्रमाचं नियोजन पालकमंत्री गिरीष महाजनांना उत्तम पद्धतीने केलं आहे. आजचा जो मंडप बांधला आहे, तसा मंडप मी कधीच पाहिलेला नाही. महाजनांचं दिमाखदार काम चाललेलं , त्यामध्ये महाजन तरबेज आहेत. परंतु राज्यात आता तीन पक्षांचं सरकार असून दोन पक्षांचं झेडे लावलेत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही झेंडा लावा, असं अजित पवार म्हणाले आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही उपस्थित होते. त्यांच्यासमोरच अजित पवारांनी मिश्किलपणे टिप्पणी केल्याने जनसमुदयामधून एकच हशा पिकल्याचं दिसून आलं होतं.

Jawan Prevue: किंग खानने चाहत्यांना दिलं सरप्राईज; ‘जवान’ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला!

तसेच मी जरी इकडे तिकडे असलो तरी आमचा उद्देश एकच आहे. या देशाचं आणि राज्याचं भलं करणं हाच आमचा उद्देश आहे. दरम्यान, अजित पवारांनी गिरीष महाजनांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचंही कौतूक केल्याचं दिसून आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा परदेशात नेतृत्व करीत असतात त्यावेळी विदेशी लोकं त्यांचं उस्फुर्तपणे स्वागत करीत असतात. मोदी ज्या आत्मितयेतेने काम करीत आहेत, त्यांच्यामुळे भारताला जगात एक प्रगत देश म्हणून ओळख निर्माण होणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.

दरम्यान, महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. शिवरायांनी राज्यातल्या 18 पगड जातींना सोबत घेऊन राज्य केलं होतं. त्यामुळे मी आज मुख्यमंत्री, सर्व आमदार, खासदारांसमोरच सांगतो हे सरकार सर्वधर्मीयांना आणि समाजघटकांना न्याय देण्याचं काम करणार असल्याचा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Tags

follow us