Jawan Prevue: किंग खानने चाहत्यांना दिलं सरप्राईज; ‘जवान’ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला!

Jawan Prevue: किंग खानने चाहत्यांना दिलं सरप्राईज; ‘जवान’ची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला!

Jawan Prevue Release: बॉलिवूडचा किंग (King Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) या सिनेमाच्या टीझरची मोठ्या आतुरतेने चाहते  बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. या सिनेमाचा टीझर अखेर आज १० जुलै रोजी प्रदर्शित कर्णयुगात आले आहे. परंतु या टीझरच्या ऐवजी निर्मात्यांनी चाहत्यांना एक मोठं सरप्राईज देखील दिले आहे. किंग खानच्या ‘जवान’चा प्रिव्ह्यू (Jawan Preview) नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

सिनेमाचा हा प्रिव्ह्यू पाहून चाहत्यांची या सिनेमासाठी उत्सुकता ताणली गेल्याचे दिसून येत आहे. या प्रिव्ह्यूमध्ये किंग खान एका सीनमध्ये त्याच्या चेहऱ्यावरील आणि डोक्यावरील बँडेज उघडत असल्याचे दिसून आला आहे. यानंतर जेव्हा त्याचा टक्कल केलेला चेहरा समोर आला आहे, तेव्हा ते पाहून सगळेच स्तब्ध झाल्याचे पाहायला मिळाले आहे. प्रिव्ह्यू पाहूनच ‘जवान’मधली किंग खानची व्यक्तिरेखा किती भयानक आणि खतरनाक असणार आहे, याचा अंदाज  बांधला जात आहे.

या सिनेमाच्या पोस्टरने अगोदरच मोठ्या प्रमाणात खळबळ उडवून टाकली आहे. पोस्टर्समध्ये किंग खान याचा चेहरा आणि डोकं पुर्नहता पट्टीने बांधल्याचे दिसून आले आहे. आता प्रिव्ह्यूला बघून देखील प्रत्येकाला मोठा धक्का बसला आहे. किंग खान ‘जवान’मध्ये दमदार संवाद म्हणताना देखील दिसून आला आहे. या प्रिव्ह्यूमध्ये देखील याची धमाकेदार झलक दिसून आली आहे. यामध्ये किंग खानचा एक डायलॉग देखील चाहत्यांसाठी प्रदर्शित करण्यात आला आहे.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

‘जब मैं विलेन बनता हूं ना, तो मेरे सामने कोई हीरो टिक नहीं पाता है’. त्याचा हा संवाद ऐकून सगळ्यांच्याच अंगावर शहारे येणार आहेत. या सिनेमात दीपिका पदुकोणची खास भूमिका दिसून येणार आहे. ‘जवान’च्या प्रिव्ह्यूमध्ये ती लाल साडीत अॅक्शन करत असल्याचे चाहत्यांना दिसून येणार आहे. तर, नयनतारा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. या प्रिव्ह्यूमध्ये, मेट्रोच्या आत एक सीन शूट करण्यात आला आहे. यामध्ये किंग खान ‘आपको हमारी कसम लौट आये’ वर नाचत असताना दिसला आहे. तर, यावेळी मेट्रोत बसलेले लोक किंग खानला घाबरले असल्याचे दिसत आहे. किंग खानचा हा खलनायक अवतार पाहून सर्वाना मोठा धक्का बसणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube