Download App

बिहार पॅटर्न राबवा, CM पदी माझं नाव जाहीर करा; अजितदादांचा शाहांना प्रस्ताव?

अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एक बैठक झाली. मुख्यमंत्री पदासाठी माझे नाव जाहीर करा.

Ajit Pawar : राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ (Maharashtra Elections) आलेल्या असतानाच काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मुंबईत होते. येथे त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. तसेच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतील (Mahayuti) जागावाटपाचा आढावा घेतला. महायुतीत कुणाला किती जागा मिळणार याबाबत अजून कहीच निश्चित नाही. मात्र मित्र पक्षांनी किती जागा पाहिजेत याची मागणी अमित शाहांना दिल्याचे समजते.

अजित पवार यांनी तर एक महत्वाचा (Ajit Pawar) प्रस्ताव अमित शाहांसमोर मांडल्याची चर्चा आहे. अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांनी आपल्या मनातील मुख्यमंत्रि‍पदाची इच्छा बोलून दाखवल्याची माहिती आहे. यासाठी त्यांनी बिहार पॅटर्नचा दाखला दिला. निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी महायुतीने माझे नाव जाहीर करावे असे त्यांनी अमित शाहांना सांगितले. द हिंदू (The Hindu) या इंग्रजी दैनिकाने याबाबत वृत्त दिले आहे.

बाळासाहेब थोरातांविरोधात थेट अमित शाहंचा प्लॅन… गुजरातचे दोन ट्रबल शूटर संगमनेरमध्ये

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते. येथे आल्यानंतर त्यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले. यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर राज्यातील भाजप नेत्यांबरोबर एक बैठक झाली. या बैठकीत निवडणुकी संदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. भारतीय जनता पार्टीचे 50 टक्के उमेदवार निश्चित झाल्याची माहिती मिळाली.

यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसंदर्भातील जागावाटपाबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजप किमान 150 जागा लढवू इच्छित आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मात्र 70 जागांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे सध्या 40 आमदार असलेल्या मतदारसंघांबाबत चर्चा झाली.  या जागा आम्ही सोडणार नाही अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे तर या व्यतिरिक्त महाविकास आघाडीच्या काळातील राजकीय समीकरणानुसार काँग्रेसच्या वाट्याच्या दहा ते बारा जागा मिळाव्यात अशी मागणी राष्ट्रवादीने या बैठकीत केल्याचे समजते.

निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा; गृहमंत्री अमित शाह यांचं मोठं विधान

follow us