Download App

‘लाडकी बहिण योजने’चा तुमच्या मनात पोटशूळ उठलायं; रुपाली पाटलांची खडसेंना चपराक

मुख्यमंंत्री लाडकी बहिण योजनेचा तुमच्या मनात पोटशूळ उठलायं, तो उठू देऊ नका, अशी चपराक रुपाली पाटलांनी रोहिणी खडसे यांना दिलीयं.

Rupali Patil On Rohini Khadse : मुख्यमंंत्री लाडकी बहिण योजनेचा तुमच्या मनात पोटशूळ उठलायं, तो उठू देऊ नका नाहीतर कायमस्वरुपी त्रास करुन घ्यावा लागणार असल्याची चपराक अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटलांनी (Rupali Patil) शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांना दिलीयं. दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरुन रोहिणी खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीयं. या टीकेवर रुपाली पाटील बोलत होत्या.

अश्रूंचा पूर ते प्रेमाचा गेम; ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या Top हेडलाईनमध्ये नेमकं काय असणार?

रुपाली पाटील म्हणाल्या, रोहिणी खडसे यांचे वडील आधी भाजपात होते, नंतर राष्ट्रवादी आले आहेत. तर सख्ख्या वहिनी मंत्री आहेत. राजकारणाची पार्श्वभूमी असलेलं घराणं तुम्ही अस्तित्वासाठी विविध पक्षात काम करीत आहात. लाडकी बहिण योजनेचा तुमच्या मनात पोटशूळ उठला आहे, तो उठवू देऊ नका, या शब्दांत रुपाली पाटलांनी रोहिणी खडसे यांच्यावर टीका केलीयं.

तसेच इतर अनेक प्रश्नांमध्ये नक्की सुटले पाहिजेत. हे प्रश्न सोडवत असताना माता, भगिनींना खारीचा वाटा भाऊ म्हणून दादांनी ओवाळणी दिलीयं. त्यावर तुम्ही जळू नका, त्रास करून घेऊ नका, नाहीतर तुम्हाला हा त्रास कायमस्वरूपी करून घ्यावा लागणार असल्याचाही इशारा पाटील यांनी दिलायं.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दिल्ली पोलिसांना मोठ यश; पुणे ISIS मॉड्यूलशी संबंधित दहशतवादी अटक

काय म्हणाल्या होत्या रोहिणी खडसे?
लाडकी बहीण, लाडकी बहीण करताय, यापेक्षा आम्हा महिलांना सुरक्षित वातावरण हवं आहे. आम्हाला 1500 रुपये देऊन, तुम्ही आमचं मत घेऊ इच्छिता. पण आमचं मन यात रमलेलं नाही. माझ्या माता-भगिनींच्या मुलाला नोकरी हवी, बापानं अन् पतीने शेतात घाम गाळून पिकविलेल्या पिकाला भाव हवा आहे. आम्हाला चिंता असते, पिकाला भाव मिळाला नाही तर माझा बाप आत्महत्या करणार नाही ना? माझ्या भावाच्या हातात नोकरी असेल तर आम्हाला रक्षाबंधनाला माहेरी जाण्यात आनंद आहे. तुमच्या 1500 रुपयांमध्ये हे सुख मिळणार आहे का? असा थेट सवाल रोहिणी खडसे यांनी केला.

दरम्यान, राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने प्रयत्न करत आहेत. तुम्ही सांगितलेले सगळे प्रश्न सुटले पाहिजेत हे सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा काम करत आहेत. तुमच्या लक्षात आलं पाहिजे जेव्हा एक हाती सत्ता अजितदादांच्या एक हाती येईल जेव्हा दादा काम करतील तेव्हा लोक दादांना मत देतील, असा विश्वासही रुपाली पाटील यांनी यावेळी व्यक्त केलायं.

follow us