अश्रूंचा पूर ते प्रेमाचा गेम; ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या Top हेडलाईनमध्ये नेमकं काय असणार?

अश्रूंचा पूर ते प्रेमाचा गेम; ‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या Top हेडलाईनमध्ये नेमकं काय असणार?

Bigg Boss Marathi Day 13 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) घरात आज ‘कल्ला न्यूज’चा (Kalla News) सेगमेंट पार पडणार आहे. या कल्ला न्यूज सर्वांचच लक्ष वेधून घेणार आहेत. ‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) अंकिता वालावलकर, गोलीगत सूरज चव्हाण (Suraj Chavan) आणि धनंजय पवार (Dhananjay Pawar) हेडलाईन्स वाचताना दिसणार आहेत.’बिग बॉस मराठी’चा नवा सीझन सुरू झाल्यापासून अनेक बातम्या चांगल्याच गाजल्या. अश्रूंचा पूर ते प्रेमाचा गेमपर्यंत अनेक बातम्या नेटकऱ्यांनी आवडीने वाचल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


आज कल्ला न्यूजमध्ये धनंजय पवार पहिली हेडलाईन वाचताना दिसत आहे. धनंजय पवार म्हणतोय,”बिग बॉस’च्या घरात आलाय अश्रूंचा पूर, हरवून बसलेत खेळातला सूर…सांगा सूरज भाऊ कोण?” त्यावर सूरज आर्याचं नाव घेतो. त्यानंतर अंकिता पुढची हेडलाईन वाचत म्हणते,”बिग बॉस’च्या घरात फुलतंय प्रेम की सुरू आहे प्रेमाचाच गेम”. निक्की आणि अरबाजसाठी ही हेडलाईन असते. त्यानंतर धनंजय पुढची हेडलाईन वाचत म्हणतो,”बाहेर असतोय टीमचा कॅप्टन आणि इथं मात्र आहे आहे रात्रीचा गडी”. त्यावर अंकिता आणि सूरज धनंजयचच नाव घेतात.

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील ‘कल्ला न्यूज’ पाहण्यासाठी प्रेक्षकांना आजचा एपिसोड पाहावाच लागेल. मनोरंजनासह सदस्यांना सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न या कल्ला न्यूजच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

सूरजला गेम कळला नाही, पण त्याला माणसं कळली

गोलीगत सूरजला ‘बिग बॉस मराठी’चा खेळ कळलाच नाही, अशी चर्चा होऊ लागली आहे. मात्र त्याने स्वत:वर मेहनत घेतली आणि आपला खेळ दाखवायला सुरुवात केली. वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने देखील सूरजच्या खेळीचं कौतुक केलं. तसेच त्याला यापुढेही गोलीगत पॅटर्नने खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं.

Bigg Boss Marathi: लसणाच्या ठेच्यासारखा निक्कीचा राग; अरबाज पचवू शकेल का?

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये गोलीगत सूरज चव्हाण गार्डन एरियामध्ये केर काढताना दिसत आहे. त्यावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू वालावलकर आणि हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळे चर्चा करताना दिसत आहेत. अंकिता म्हणतेय,”सूरजला असं बघून मला कसंतरी वाटतं”. त्यावर पॅडी म्हणतो, ‘बिचारा बाहेर देखील हेच काम करत असेल. तो काल मला म्हणालेला, दादा मला खूप वाईट वाटतं मी वर झोपतो आणि तुम्ही खाली झोपता’. त्यावर अंकिता म्हणते, ‘सूरजला गेम कळला नाही, पण माणसं कळली’.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube