Sunil Tatkare On Rohit Pawar : ज्यांनी संघर्ष यात्रा काढली त्यांनीच भाजपसोबत जाण्यासाठी पत्रावर सही केली असल्याचं म्हणत अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे(Sunil Tatkare) यांनी आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांच्या युवा संघर्ष यात्रेवर बोट ठेवलं आहे. मुंबईत आज अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पाडली. या बैठकीनंतर सुनिल तटकरेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांच्या निधनाची अफवा! बाबा पूर्णपणे बरे; नंदना सेन यांची माहिती
सुनिल तटकरे म्हणाले, युवा संघर्ष यात्रा…कसला संघर्ष… कुणाशी संघर्ष हे आपल्याला कळेलच. युवा संघर्ष यात्रा ज्यांनी काढली आहे, त्यांनीच भाजपच्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी पत्रावर सही केलेली होती. राम शिंदे यांनी त्यांना काही प्रश्न विचारले होते, त्याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला मिळालेले असे कुठे दिसत नसल्याचंही सुनिल तटकरे म्हणाले आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर होताच रॉकेट्री टीमचा मोठा उपक्रम, तब्बल ६० चिमुकल्यांचं आयुष्यचं बदलणार
दरम्यान, आमदार रोहित पवार राज्यातील बेरोजगार तरुण, स्पर्धा परीक्षा देणारे युवा, डिग्री असूनही काम नसणारे विद्यार्थी, आर्थिक अडचण असलेले विद्यार्थी या सर्व समस्यांसाठी युवा संघर्ष यात्रा’काढणार आहेत.
Assembly Elections : 5 राज्यांच्या निवडणुका मोदी सरकारला निरोप ठरणार; ठाकरे गटाचा जोरदार हल्ला
पुण्यातून तुळापूरला जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन करणार आहे. ही यात्रा रोहित पवार आणि राष्ट्रवादीची नसणार ही यात्रा फक्त युवा तरुणांची असणार आहे. पुण्यातून तुळापूरला जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन ही यात्रा सुरु होणार असून पायी यात्रेचे ८२० किलो मीटर अंतर असून ही यात्रा २४ ऑक्टोबरला म्हणजेच दसऱ्यापासून सुरु होणार आहे.
दिवसाला २७ ते २४ किलोमीटर चालणार आहे. आमदार रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेवरुन सुनिल तटकरे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. रोहित पवार यांच्या संघर्ष यात्रेनंतर अजित पवार गटाकडूनही पक्षाच्या संघटनासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु करण्यात येणार आहे. दसऱ्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्यभर झंझावात दौरा सुरु करणार असल्याचंही सुनिल तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.