Download App

दिग्गजांची नावे घेत अजितदादांसाठी उमेश पाटील विरोधकांना भिडले; भाजपलाही दिली आठवण

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री लाडकी बाहीण योजनेबद्दल मोठा दावा केला.

  • Written By: Last Updated:

Umesh Patil Press Conference : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजप सोबत गेल्यामुळे आमच्यावर टीका केली जाते. पण नितीश कुमार सोबत गेले, महेबुब मुफ्ती गेल्या जॉर्ज फर्नांडिस गेले त्यावर कुणी शंका घेतली नाही. मात्र अजित पवार शंका घेतली जाते. परंतु, अम्ही पुरोगामी विचार सोडणार नाही.  (Umesh Patil)  आमचे आजही तेच विचार आहेत. लोकांना सरकार आपल्यासाठी काहीतरी करतय असं वाटणं महत्वाचं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आम्हाला निवडणुकीत मते मिळवण्यासाठी उपयोग होईल, असा थेट दावा उमेश पाटील यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत (Press Conference) बोलत होते.

Video: थरकाप उडवणारा भीषण अपघात! स्लीपर बस अन् टँकरची धडक; 18 जणांचा जागीच मृत्यू

राज्यातील अडीच कोटी महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेता लाभ मिळणार आहे. रेशन कार्ड असणे हेच उत्पन्नाचा दाखल आहे. त्यामुळे कागदोपत्री अडकून महिला वंचित राहू नये असा सरकारचा प्रयत्न आहे. राज्यातील कोणत्याही महिलेने कधीही अर्ज दाखल केला तर तिला पूर्वलक्षी निधी मिळणार आहे. रक्षाबंधन अनुषंगाने दीड कोटी महिलांच्या खात्यावर जमा होतील. या योजनेसाठी 46 हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

राज्याच्या तिजोरीत यंदाच्या वर्षी जीएसटी चे 76 हजार कोटी अतिरिक्त जमा झाले आहे. त्यामुळे विरोधक राज्यावर या योजनेने आर्थिक संकट येईल हे आरोप करणे यात कोणतेही तथ्य नाही. महागाई मुळे गॅस दर वाढले आहे त्याबद्दल अर्थमंत्री अजित पवार यांनी पात्र कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्याचं ठरवलं आहे. सिलेंडर किंमत वाढत असताना केवळ केंद्राकडे बोट दाखवून काही होणार नाही. राज्यातील प्रत्येक भावाला कौशल्य प्रशिक्षणसाठी दर महिना दहा हजार प्रोत्साहन हप्ता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या माध्यमातून आयुष्यभर त्याला रोजगारसाठी पर्याय उपलब्ध होईल, असंही ते म्हणाले.

माणुसकीला काळिमा फासणारी घटना; जमिनीच्या वादातून भावाने अंगावर डिझेल ओतून वृद्धाला जाळलं

या योजनेसाठी 6 हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी वैदाकिय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी राज्य सरकारकडून 100 टक्के मोफत शिक्षण मिळणार आहे. त्यामुळे कोणती मुलगी उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाही. उच्च शिक्षणासाठी मुलांना आर्थिक मदत सरकार करणार आहे. राज्यातील अडीच लाख मुली या योजनेचा फायदा घेतील. शेतकरी आत्महत्या, पीक हमीभाव यादृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे. शेतकरी वीजबिल माफ करण्यात आले असून आगामी काळात साडेसात एचपी पंप वापराला शेतकऱ्यांना वीज माफी जाहीर करण्यात आली आहे. दुधाचा भाव हा नेहमी कमी जास्त होत असतो तो किमान शेतकऱ्यास किमान भाव 30 रुपये करण्यात आली असून पाच रुपये सरकारकडून अनुदान मिळणार आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

follow us