Download App

‘रोहित पवार बच्चा, मी उत्तर द्यावं इतका तो मोठा झाला नाही…’; अजितदादांची खोचक टीका

  • Written By: Last Updated:

Ajit Pawar : काल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती अ‍ॅग्रो (Baramati Agro) या कंपनीवर ईडीने (ED) छापेमारी केली. बारामती येथील कारखान्यासह मुंबई, पुणे, पिंपरी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर येथील सहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छापेमारीवरून राजकीय वातावरण तापले आहे. रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. तसंच सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि अजित पवार गटावरही निशाणा साधला. त्याला आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रत्युत्तर दिलं.

“BJP आपल्या धर्माचा शत्रू , 20 ते 26 जानेवारी घरीच रहा” : बड्या मुस्लिम नेत्याचा सल्ला 

आज अजित पवार पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी अनेक विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांना बारामती अ‍ॅग्रोवरील छापेमारीनंतर रोहित पवारांनी केलेल्या टीकेविषयी विचारल. त्यावर बोलतांना अजित पवार म्हणाले की, रोहित पवार कच्चा आहे. कच्चा-बच्चाबद्दल जास्त बोलायचं नसतं. त्याच्या प्रश्नाला मी उत्तरं द्यावी, एवढा काय तो मोठा झालेला नाही. त्याला माझे कार्यकर्ते आणि प्रवक्ते उत्तरं देतील, अशी खोचक टीका अजितदादांनी केली.

“लवकरच मोठा राजकीय भूकंप” : गिरीश महाजनांचा दाव्याने CM शिंदे अन् ‘काँग्रेस’ टेन्शनमध्ये! 

ते म्हणाले, तुम्हाला सगळ्याना ठाऊक आहे, मागे माझ्याही 22 ठिकाणांवर कारवाई झाली. शेवटी स्वायत्त संस्थांना चौकशी करण्याचा अधिकार आहे, जर तथ्य असेल तर बाहेर येत, तथ्य नसेल तर चौकशी होऊन जाते. आजच नाही. तपास यंत्रणा अशा अनेक प्रकरणांची चौकशी करत असतात. पण माध्यमे मोजक्याच प्रकरणांना प्रसिध्दी देतात. वर्षभरात अनेकांची चौकशी झाली आहे.

दरम्यान, आणखी एकाने पुन्हा रोहित पवारांविषयी विचारले असता अजित पवार म्हणाले, मी तुम्हाला आधीच सांगितले आहे, मी सौम्या गोम्यांना उत्तरं देत नाही.

काल शरद मोहोळची हत्या झाली. त्यावरही अजित पवारांनी भाष्य केलं. शुक्रवारी पुण्यात कायदा सुव्यवस्थेसंदर्भात घटना घडली होती. परंतु, पोलिसांनी ताबडतोब आरोपींना अटक केली. मी पालकमंत्री असल्यामुळं महाराष्ट्रासह पुण्याकडं लक्ष ठेवावं लागतं. यासंदर्भातली सखोल चौकशी केल्यानंतर सत्य समोर येईल.

राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवरही अजित पवारांनी भाष्य केलं. राज ठाकरेंनी किती सहकारी संस्था उभ्या केल्या, असा सवाल त्यांनी केला.

काय म्हणाले होते रोहित पवार?

बारामती अ‍ॅग्रोवरील कारवाईबाबत रोहित पवार म्हणाले होते की, सात-आठ दिवसांपूर्वी दिल्लीला कोण गेलं होतं? अजितदादा मित्रमंडळाचं कोण दिल्लीत गेलं? मागच्या सात दिवसात कोण कुठे गेले? हे पाहणं महत्त्वाचं आहे. मी चूक केली असती तर अजितदादांसोबत भाजपमध्ये जाऊन बसलो असतो. पण, आमच्यासाठी विचार महत्वाचा आहे. महाराष्ट्र धर्म आणि अस्मिता महत्त्वाची आहे. माझा आक्षेप ईडीच्या अधिकाऱ्यांवर नाही. त्यांना दिलेले काम ते करत आहेत.’ अशा शब्दांत रोहित पवार यांनी टीका केली होती.

follow us